तळेगाव रोही : काळखोडे येथे वसुंधरा पाणलोट विकास ग्रामविकास व जलसंधारण विभाग पुरस्कृत एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत जाणीव जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कलापथकांच्या माध्यमातून गीताद्वारे पाणीटंचाई कशी मिटवता येईल तसेच पाणी अडवा, पाणी जिरवा, झाडे लागवडीचे महत्त्व, कृषिखात्याअंतर्गत गावात शेतकऱ्यांचे १३-१४ मध्ये शेतकरी बचतगट, महिला बचतगट, ग्रामीण भागातील छोट्या उद्योजकांचे बचतगट असे एकूण ११ बचतगटांची स्थापना करण्यात आली. या बचतगटांच्या माध्यमातून शेतीसाठी पाणी हा महत्त्वाचा घटक समोर ठेवून शासनाने नगर जिल्ह्यातील हिवरेबाजार या गावाचा जलयुक्त शिवारामध्ये कसा सहभाग आहे, याचे कलापथकाने जनजागृतीत दाखवून दिले. या कलापथकात डॉ. राजेश साळुंके, राजेंद्र गायकवाड यांनी सहभाग घेतला होता. समन्वयक इंडियन चॅरिटेबल ट्रस्ट (धुळे), प्रकल्प प्रशिक्षण संस्था (नाशिक)चे राकेश पाटील, भरत चौधरी, रंजित राजे भोसले, नितीन कोटेचा यांनी ग्रामस्थांना माहिती दिली. यावेळी पाणलोट समिती अध्यक्ष संजय शेळके, सचिव सरपंच विलास शेळके, सर्व सदस्य, बळवंत शेळके, अंबादास शेळके, नरहरी शेळके आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)
काळखोडे येथे पाणलोट अंतर्गत जनजागृती
By admin | Updated: January 11, 2016 22:30 IST