शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

पाणी स्वच्छतेबाबत चित्ररथाद्वारे जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 01:35 IST

राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने स्वच्छतेविषयक जनजागृतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात चित्ररथाद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. जिल्ह्यात या एलइडी व्हॅनचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे यांच्याहस्ते करण्यात आला. या एलइडी व्हॅनद्वारे स्वच्छतेविषयी गावात जनजागृती करण्यात येणार आहे.

नाशिक : राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने स्वच्छतेविषयक जनजागृतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात चित्ररथाद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. जिल्ह्यात या एलइडी व्हॅनचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे यांच्याहस्ते करण्यात आला. या एलइडी व्हॅनद्वारे स्वच्छतेविषयी गावात जनजागृती करण्यात येणार आहे.यावेळी शिक्षण व आरोग्य सभापती यतिंद्र पगार, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काळे, अशोक डोंगारे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, प्रदीप चौधरी, पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी ईशादिन शेळकंदे आदी उपस्थित होते.यावेळी सांगळे यांनी सांगितले की, शासनाकडून निवडलेल्या सर्व गावात प्रभावीपणे या माध्यमाचा उपयोग करून स्वच्छतेविषयी जनजागृती केली जाईल. या एलइडी व्हॅनच्या-माध्यमातून जिल्हास्तरावर शाश्वत स्वच्छता, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, वैयक्तिक शौचालयाचा वापर व स्वच्छता व अन्य पाणी व स्वच्छता विषयाची ग्रामस्तरावर व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे.पाणीपुरवठा स्वच्छता विषयक संदेश प्रसारित करण्यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने राज्यात विविध उपक्रम राबविण्यात येत असून, एलइडी व्हॅनच्या-माध्यमातून जिल्ह्यातील १५० गावात पाणी व स्वच्छतेबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्याला पाणीपुरवठा व स्वच्छता विषयाचे संदेश प्रसारित करण्यासाठी एलइडी व्हॅन मिळाली असून, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांचे मार्गदर्शनात, तर पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांच्या उपस्थितीत या एलइडी व्हॅनचा शुभारंभ करण्यात आला. उद्घाटनप्रसंगी जिल्हा कक्षातील संदीप जाधव, रवि बाराथे, माधवी गांगुर्डे, भाग्यश्री बैरागी, सागर रोडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान