उमराणे : येथील ग्रामीण रु ग्णालयाच्या वतीने गोवर व रु बेला लसीकरणाबाबत छत्रपती शिवाजी मराठा विद्यालयाच्या मदतीने संपूर्ण गावातुन जनजागृती रॅली काढण्यात आली. रु ग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. दिपक पवार यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आलेल्या गोवर व रु बेला (खसरा) लसीकरण जनजागृती मोहीमेत नऊ महिन्यांपासुन पुढील व पंधरा वर्षांच्या आतील सर्व बालकांना लस देऊन घेणे, यापुर्वी लस दिली गेली असली तरी पुन्हा लस देणे याबाबत प्रबोधन करण्यात आले. गोवर व रु बेला जनजागृती रॅलीत जि. प.सदस्य यशवंत शिरसाठ, माजी जि.प.सदस्य प्रशांत देवरे, पं.स.सदस्य धर्मा देवरे, सरपंच सोनाली देवरे, बाजार समतिीचे माजी सभापती विलास देवरे, रु ग्णालयाचे डॉ. वैभव पाटील, डॉ.प्रियंका गोडे, छत्रपती विद्यालयाचे मुख्याध्यापक बी.झेड.साबळे तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी तसेच रु ग्णालयाचे सर्व कर्मचारी व ग्रामस्थ सहभागी झाले होते.
रु बेला लसीकरणाबाबत ग्रामीण रु ग्णालयाकडुन जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 16:33 IST
उमराणे : येथील ग्रामीण रु ग्णालयाच्या वतीने गोवर व रु बेला लसीकरणाबाबत छत्रपती शिवाजी मराठा विद्यालयाच्या मदतीने संपूर्ण गावातुन जनजागृती रॅली काढण्यात आली.
रु बेला लसीकरणाबाबत ग्रामीण रु ग्णालयाकडुन जनजागृती
ठळक मुद्दे ही लस नोव्हेंबर ते डिसेंबर मिहन्यात देण्यात येणार असल्याचे ग्रामीण रु ग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. पवार यांनी सांगितले.