शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त येवल्यात जनजागृती रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 17:48 IST

येवला : जागतिक क्षयरोग दिनानिमित्त येवला ग्रामीण रु ग्णालयाच्या वतीने क्षयरोग जनजागृती रॅली काढण्यात आली.

ठळक मुद्देदेशात दररोज ४० हजार व्यक्तींना क्षयरोगाची लागण होते.

येवला : जागतिक क्षयरोग दिनानिमित्त येवला ग्रामीण रु ग्णालयाच्या वतीने क्षयरोग जनजागृती रॅली काढण्यात आली.सकाळी ९.३० वाजता ग्रामीण रु ग्णालयातून वैद्यकीय अधिकारी नितीन जाधव यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवुन रॅलीची सुरु वात झाली. या रॅलीची सुरु वात ग्रामीण रु ग्णालयापासून झाली. फत्तेबुरु ज नाका, गंगादरवाजा, काळामारु ती रोड, महाराणा प्रताप पुतळा, सराफ फाटा, मेनरोड, या मार्गाने विंचूर चौफुलीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ समारोप करण्यात आला.रॅलीत क्षयमुक्त जगासाठी शिलेदार होऊया, सर मिळून नवा इतिहास घडवूया या घोषवाक्यासह क्षय रोगाची कारणे लिहिलेली फलक शहर वासियांचे लक्ष वेधून घेत होते. यावेळी आरोग्यसेवक व्ही.सी. पैठणकर यांनी क्षयरु ग्णांनी नियमित उपचार घ्यावा, खोकताना, शिंकताना रु माल लावावा, इतरत्र कोठेही थुंकू नये असे सांगितले. तर नितीन पवार यांनी सांगितले कि देशात दररोज ४० हजार व्यक्तींना क्षयरोगाची लागण होते. ५ हजार व्यक्तींना क्षयरोग होतो. त्यापैकी १ हजाराहून अधिक व्यक्ती क्षयरोगाने मृत्युमुखी पडतात. परंतु क्षयरोग हा आजार पूर्णता बरा होतो. जागतिक आरोग्य संघटनेचे क्षयरोगाचा नायनाट करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. तसेच दोन आठवड्यापेक्षा जास्त दिवस खोकला, संध्याकाळी तप, छातीत दुखणे, दाम लागणे, रात्री घाम येणे, भूक मंदावणे, थकवा येणे यासारखी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा असे आवाहन केले. शासकीय व काही खाजगी संस्थामध्ये क्षयरोगावर संपूर्णपणे मोफत उपचार केला जातो. त्याचा रु ग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. भरत कुलकर्णी, डॉ. पंकज पाटील व डॉ. प्रवीण वेदपाठक यांनी केले.रॅलीत एस. एन. डी. व येवला निर्संग स्कुलचे विद्यार्थी व विद्यार्थिनी, सह शिक्षक व आरोग्य कर्मचारी यांचा समावेश होता.कार्यक्र माच्या यशस्वीतेसाठी क्षयरोग पथकाचे भगवान काकड, डॉ. जितेंद्र पवार, देवेद्र गोफणे, अंकुश शिंदे, विश्वजित परदेशी, प्रा. आशा सोनवणे, सुधाकर भूसारा, ओंकार बन्सवाल, मयुरी बत्तीसे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्र माचे सूत्रसंचालन नितीन पवार यांनी केले.(फोटो २७ येवला)