शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

अंनिसतर्फे जनजागृती करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 16:30 IST

मालेगाव कॅम्प : मालेगाव शहर तालुक्यामध्ये अंधश्रद्धा निर्मुलन समितीची कार्य अधिक जोमाने करण्यासाठी विविध सामाजिक उपक्रम घेणार आहे. तसेच नरेंद्र दाभोलकर, पानसरे यांच्या स्मरणार्थ सप्ताह पाळण्यात येणार आहे. यात शालेय विद्यार्थी, सर्व सामान्य नागरिकांसाठी जनजागृती करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन रा.कॉँ.नेते राजेंद्र भोसले, अंनिस मालेगाव शाखेचे समर्थक नचिकेत कोळपकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केले.

ठळक मुद्देमालेगाव : पत्रकार परिषदेत राजेंद्र भोसले यांची माहिती

मालेगाव कॅम्प : मालेगाव शहर तालुक्यामध्ये अंधश्रद्धा निर्मुलन समितीची कार्य अधिक जोमाने करण्यासाठी विविध सामाजिक उपक्रम घेणार आहे. तसेच नरेंद्र दाभोलकर, पानसरे यांच्या स्मरणार्थ सप्ताह पाळण्यात येणार आहे. यात शालेय विद्यार्थी, सर्व सामान्य नागरिकांसाठी जनजागृती करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन रा.कॉँ.नेते राजेंद्र भोसले, अंनिस मालेगाव शाखेचे समर्थक नचिकेत कोळपकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केले.भोसले यांच्या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. कोळपकर म्हणाले शहरातील अंनिस शाखा अधिक मजबुत व कार्यरत करण्यासाठी नवी कार्यकारिणी घोषित केली. यात अंनिस मालेगाव शाखेचे कार्याध्यक्षपदी डॉ. संदीप खैरनार, प्रधान सचिव अंकुश मयाचार्य, उपक्रम प्रमुख नम्रता जगताप, वैज्ञानिक जाणीवा प्रकल्प प्रमुख रविंद्र अहिरे व उर्वरित सदस्य यांची नावे घोषित केली. प्रधान सचिव अंकुश मयाचार्य यांनी सप्ताहभर चालणाऱ्या कार्यक्रमांची माहिती दिली. १२ ते २० आॅगस्ट दरम्यान शहरातील १५ शाळांमध्ये सर्पविज्ञान अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना सर्प मित्राकडून सापाविषयी माहिती देण्यात येणार आहे. तर अंधश्रद्धा, विज्ञान या विषयावर स्पर्धा आठवी, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली आहे. धुळे येथील व्याख्याते दिनेश मोरे यांचे विवेकवाद व सध्याची परिस्थिती यावर व्याख्यान, तरुण-तरुणींना समुदेशन, नशाबंदीसाठी दारु नको दुध घ्या असे विविध सामाजिक जनजागृतीचे कार्यक्रम अंनिस मालेगाव शाखेतर्फे राबवण्यात येणार असल्याचे मयाचार्य यांनी सांगितले.राजेंद्र भोसले यांनी अंधश्रद्धा व बुवाबाजी या विषयांवर चिंता व्यक्त केली. अंनिसच्या कार्यात जनजागृतीसाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन केले. राष्टÑ सेवा दल, हम हिंदुस्थानी संघटना, साने गुरूजी परिवार, साधना कलामंच, नवयुग शेतकरी संघटना, राष्टÑवादी कॉँग्रेस पक्षाचा पाठींबा असल्याचे सांगितले. पत्रकार परिषदेत दिनेश ठाकरे, अंनिस सदस्य अश्वीनी मोरे, प्रशांत पाटील, स्वाती वाणी नम्रता जगताप आदि उपस्थित होते.