नाशिक : खासगी क्लास नोंदणीला क्लासचालकांचा विरोध नाही, परंतु खासगी क्लासेसच्या शुल्कांवर सरकारने कोणतेही निर्बंध आणू नये, तसेच रहिवासी जागेत व्यावसायिक कर आकारून एकाच नोंदणी अधिकाºयाला क्लासला परवानगी देण्याचे अधिकार देण्यात यावे आदी दुरुस्ती तथा बदल नाशिक जिल्हा प्रोफे शनल टीचर्स असोसिएशनतर्फे (पीटीए) माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य संचालनालयाला सुचविण्यात आले आहेत.राज्यातील खासगी शिकवणी वर्ग नियंत्रित करण्यासाठी तयार करण्याच्या विधेयकाच्या अनुषंगाने गठित समितीच्या मसुद्यात खासगी कोचिंग क्लासेसकडून हरकती सुचविण्यासाठी नाशिकमध्ये पारख क्लासेस येथे रविवारी (दि.१७) जिल्ह्यातील विविध क्लासेसचालकांची बैठक पार पडली. नाशिक प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष जयंत मुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत संघटनेचे सचिव कैलास देसले, खजिनदार लोकेश पारख व राज्य समितीचे प्रतिनिधी यशवंत बोरसे आदींनी उपस्थित क्लासचालकांना प्रस्तावित विधेयकासंदर्भात गठित समितीच्या बैठकीचे इतिवृत्त व मसुद्यातील तरतुदींची खासगी क्लासेसचालकांना माहिती दिली. यावेळी क्लासचालकांनी त्यांच्या प्रस्तावित मसुद्यातील विविध तरतुदींविषयी त्यांच्या हरकती नोंदवल्या आहेत. या हरकती व सुचवलेल्या तरतुदींविषयी विधेयकासंबंधी गठित समितीची २१ डिसेंबरला मुंबईत बैठकीत होणार असून, त्यावर साधकबाधक चर्चा करून मसुद्याला अंतिम स्वरूप देण्याच्या दृष्टीनेही चर्चा होणार आहे.
पीटीएची बैठक : प्रस्तावित विधेयकाच्या मसुद्यात सुचवले बदल खासगी क्लासचालकांचा शुल्क नियंत्रणाला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 00:33 IST
खासगी क्लास नोंदणीला क्लासचालकांचा विरोध नाही, परंतु खासगी क्लासेसच्या शुल्कांवर सरकारने कोणतेही निर्बंध आणू नये, तसेच रहिवासी जागेत व्यावसायिक कर आकारून एकाच नोंदणी अधिकाºयाला क्लासला परवानगी देण्याचे अधिकार देण्यात यावे आदी दुरुस्ती तथा बदल नाशिक जिल्हा प्रोफे शनल टीचर्स असोसिएशनतर्फे (पीटीए) माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य संचालनालयाला सुचविण्यात आले आहेत.
पीटीएची बैठक : प्रस्तावित विधेयकाच्या मसुद्यात सुचवले बदल खासगी क्लासचालकांचा शुल्क नियंत्रणाला विरोध
ठळक मुद्देक्लासेसचालकांची बैठकविविध तरतुदींविषयी हरकती