शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

भाविकांची तहान भागविण्यासाठी चार कोटींची तरतूद

By admin | Updated: June 2, 2015 00:38 IST

स्थायी समितीचा निर्णय : वाहनतळावर करणार पाणीपुरवठ्याची व्यवस्था

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांची तहान भागविण्यासाठी महापालिकेकडून तब्बल चार कोटी रुपये खर्च करून मुख्य रस्त्यांवरील वाहनतळावर पाणीपुरवठ्याची व्यवस्था केली जाणार आहे. स्थायी समितीच्या बैठकीत याबाबतच्या विविध विषयांना मंजुरी देण्यात आली आहे. मुख्य रस्त्यावरून शहरात दाखल होणाऱ्या भाविकांसाठी बाह्य व अंतर्गत वाहनतळे उभारण्याची कामे सुरू आहेत. या वाहनतळापासून भाविकांना सिंहस्थस्थळी पायी जावे लागणार असल्याने त्यांच्याकरिता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी लागणार असल्याने याबाबतचा प्रस्ताव स्थायीच्या पटलावर मांडण्यात आला. दरम्यान, आग्रारोड, आडगाव शिवार येथे उभारलेल्या बाह्य वाहनतळावर तब्बल १ कोटी ४५ लाख रुपये खर्चून पाणीपुरवठ्याची व्यवस्था केली जाणार आहे. पंचवटी विभागातील पेठरोड, मार्केट यार्ड, निलगिरी बाग, औरंगाबादरोड, आग्रारोड स्टेडिअम या मार्गाअंतर्गत वाहनतळांवर पीव्हीसी टाक्याद्वारे पाणीपुरवठ्याची व्यवस्था केली जाईल. त्याकरिता सुमारे एक कोटी ३९ लाख रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे. दिंडोरीरोड बाह्य वाहनतळावरील पाणीपुरवठ्यासाठी ५४ लाख ५८ हजार रुपयांच्या निधीची तरतूद केली गेली आहे, तर पेठरोड बाह्य विमानतळाकरिता ६७ लाख ६२ हजार रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. याबाबतचे सर्व विषय स्थायी समितीच्या बैठकीत पटलावर मांडले असता, सर्व सदस्यांच्या उपस्थितीत त्यास मंजुरी देण्यात आली आहे.