शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

प्रांत मुकेश भोगे यांची मुंबईला बदली

By admin | Updated: September 2, 2016 22:56 IST

उदय किसवे दिंडोरीचे नवे प्रांत

नाशिक : महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरूच असून, दिंडोरीचे प्रांत मुकेश भोगे यांची मुंबई येथील अंधेरी औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांच्या जागी उप जिल्हाधिकारी उदय किसवे यांची दिंडोरी प्रांत म्हणून बदली झाली आहे.गत महिन्यात महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश राज्य सरकारने काढले होते. त्यात तहसीलदार, प्रांत व उपजिल्हाधिकाऱ्यांच्या राज्यात विविध भागांत बदल्या करण्यात आल्या होत्या. बदल्यांमध्ये दुजाभाव होत असल्याबाबत आक्षेप घेत काही अधिकाऱ्यांनी चक्क गैरसोयीच्या बदल्यांविरोधात मॅटमध्ये धाव घेतली होती. त्यात उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे यांची जळगाव जिल्ह्णात पुनर्वसन अधिकारी म्हणून बदली झाल्यानंतर त्यांनी मॅटमध्ये धाव घेतली असता त्यांची बदली स्थगित करण्याचे आदेश देऊन त्यांची बदली नाशिकलाच होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर सिंहस्थ कुंभमेळ्यात जमिनी भूसंपादनाबाबत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या प्रांत उदय किसवे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असल्याने त्यांचीही नाशिकला बदली होण्याची शक्यता होती. त्यामुळे त्यांची दिंडोरी प्रांत म्हणून बदली झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)