शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भविष्य निर्वाह निधी कर्मचाऱ्यांचा संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 01:00 IST

वेतनश्रेणी, पदोन्नती, नोकर भरती आदींसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी अखिल भारतीय भविष्य निर्वाह निधी कर्मचारी महासंघाच्या वतीने बुधवारी एकदिवसीय देशव्यापी संप पुकारण्यात आला. या संपात नाशिकचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाल्याने दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम झाला.

सातपूर : वेतनश्रेणी, पदोन्नती, नोकर भरती आदींसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी अखिल भारतीय भविष्य निर्वाह निधी कर्मचारी महासंघाच्या वतीने बुधवारी एकदिवसीय देशव्यापी संप पुकारण्यात आला. या संपात नाशिकचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाल्याने दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम झाला.भविष्य निधी कर्मचाऱ्यांच्या ९ डिसेंबर २०१५ पासून पदोन्नती, वेतनश्रेणी, नोकर भरती यांसह अनेक मागण्या प्रलंबित आहेत. कर्मचाºयांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून वारंवार फक्त आश्वासने दिली जातात. वेतन श्रेणीप्रमाणे कर्मचाºयांची भरती होत नसल्याने काळ्या फिती लावून आंदोलन केले. धरणे आंदोलन करून शांततेच्या मार्गाने निषेध केला. तरीही कोणताही मार्ग निघालेला नसल्याने अखेर बुधवारी एकदिवसीय संप पुकारण्यात आला. या संपात द्वितीय श्रेणी, तृतीय श्रेणी व चतुर्थ श्रेणीचे १०३ अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. त्यामुळे सर्वच कामकाजावर परिणाम झाला.दिल्लीच्या मुख्यालयातील व्यवस्थापनाला आतापर्यंत महासंघाचे जनरल सेक्रेटरी कृपाकरन यांनी जवळपास १०१ पत्रं पाठवली आहेत. परंतु मुख्य कार्यालयाकडून आतापर्यंत एकही उत्तर देण्यात आले नाही. व्यवस्थापनाचे लक्ष वेधण्यासाठी अधिकाºयांना संपाची हाक द्यावी लागली, अशी माहिती कर्मचारी संघटनेचे सेक्रेटरी रमन पवार यांनी दिली. संपात युनियनचे उपाध्यक्ष अनिल पवार, देवेंद्र झा, बाळकृष्ण उशिरे, नितीन पाठक, सतीश सोनकुसरे, राजेश गुप्ता, राजाराम गाढवे, पुंडलिक कटाळे, ललित लहामगे, किशोर महाजन आदींसह महिला अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.नाशिकच्या भविष्य निर्वाह निधी कार्यालयात ५४ टक्के जागा रिक्त आहेत. त्यांचा कामाचा भार अन्य अधिकारी आणि कर्मचाºयांवर येत आहे. सेवानिवृत्तीचे प्रमाण वाढत आहे. नवीन कर्मचाºयांची नियुक्ती केली जात नाही. लिपिक पदाच्या १४६ जागा मंजूर आहेत. प्रत्यक्षात ६२ लिपिक काम करीत आहेत. अकौंट विभागासाठी ५३ कर्मचारी अपेक्षित आहेत. प्रत्यक्षात फक्त १८ कर्मचारी काम करीत आहेत.

टॅग्स :Provident Fundभविष्य निर्वाह निधीGovernmentसरकार