शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पाच महंताई प्रदान

By admin | Updated: September 7, 2015 22:48 IST

आज दोन समारंभ : साधू-महंतांकडून प्रक्रियेबाबत गोपनीयता

नाशिक : कुंभमेळ्यातील महंताईच्या प्रक्रियेला रविवारपासून प्रारंभ झाला असून, साधुग्राममध्ये आतापर्यंत पाच महंताई प्रदान करण्यात आल्या आहेत, तर उद्या (दि. ८) आणखी दोन समारंभ होणार आहेत. तथापि, सध्याच्या तणावग्रस्त वातावरणाच्या पार्श्वभूमीवर साधू-महंत आता ताकही फुंकून पीत असून, या प्रक्रियेबाबतही साधू-महंत प्रचंड गोपनीयता बाळगत आहेत. शक्यतो कुंभमेळ्यातच महंताईची प्रक्रिया होते. रिक्त झालेल्या खालशांच्या श्री महंतपदी साधूंची नियुक्ती केली जाते. वैष्णव पंथातील तिन्ही अनी आखाड्यांमध्ये सध्या ८० महंतपदे रिक्त असून, या सर्वांची महंताई होणे अपेक्षित होते; मात्र महंताईशी संबंधित काही बाबींवरून वादविवाद सुरू झाल्याने कुंभमेळ्याच्या प्रथम शाहीस्नानानंतर लगेच सुरू होणारी ही प्रक्रिया लांबली. वादावर पडदा पडून ही प्रक्रिया आता सुरू झाली खरी; मात्र साधुग्राममधील एकूणच तणावपूर्ण वातावरण पाहता, साधू-महंत महंताईबाबतही अत्यंत गोपनीयता बाळगत आहेत. सदर प्रक्रिया ही आखाड्यांतील नियमित प्रक्रिया असल्याचे सांगत बहुतांश प्रमुख महंतांकडून याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला जात आहे. महंताईच्या प्रक्रियेत होणाऱ्या अर्थव्यवहारावरूनही साधुग्राममध्ये प्रचंड संशयाचे वातावरण निर्माण झाले असून, आधीच वातावरण बिघडलेले असल्याने त्यात आणखी भर नको, असा विचार करीत अनेक जण गप्प राहणेच पसंत करीत आहेत. दरम्यान, महंताई ही जर साधूंमधील नियमित प्रक्रिया असेल, तर तिच्याविषयी एवढी लपवाछपवी कशासाठी, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. चादर चतु:संप्रदायाची

तिन्हींपैकी कोणत्याही आखाड्यात महंताईचा समारंभ असला, तरी महंताईची लाल चादर ही चतु:संप्रदायातूनच पाठवली जाते. प्रत्येक महंताई कार्यक्रमात चतु:संप्रदायातून नवनियुक्त महंतांना चादर पांघरण्यासाठी खास प्रतिनिधी रवाना केला जातो. फक्त कुंभमेळ्यातच प्रथम शाहीस्नान ते तृतीय शाहीस्नानाच्या दरम्यान ही प्रक्रिया होते. सध्या तिन्ही आखाड्यांत ८० पदे रिक्त असली, तरी या कुंभमेळ्यात किती महंताई होतील, याचा अंदाज लावता येणार नाही, असे चतु:संप्रदायाचे श्री महंत स्वामी फुलडोल बिहारीदास यांनी सांगितले.

वैष्णव पंथातील तिन्ही अनी आखाड्यांमध्ये सध्या ८० महंतपदे रिक्त असून, या सर्वांची महंताई होणे अपेक्षित होते; मात्र महंताईशी संबंधित काही बाबींवरून वादविवाद सुरू झाल्याने कुंभमेळ्याच्या प्रथम शाहीस्नानानंतर लगेच सुरू होणारी ही प्रक्रिया लांबली होती.

कार्यक्रम असे..

साधुग्राममध्ये रविवारी दोन महंताई कार्यक्रम झाले. त्यांत निर्मोही आखाड्याचे हरियाणातील भिवानीचे महंत धरमदास व पंजाबच्या ध्यानपूरमधील श्रीरामनगर खालशाचे रामदासजी यांना महंताई प्रदान करण्यात आली. सोमवारी दिगंबर आखाड्यात दोन, तर निर्वाणी आखाड्यात एक महंताई झाल्याचे कळते. त्यांत दिगंबर आखाड्याच्या काशीच्या कामधेनू, रामजानकीनगर खालशाच्या श्री महंतपदी रामदास त्यागी, तर उत्तर प्रदेशातील कानपूरच्या रामधाम विठ्ठर खालशाच्या श्री महंतपदी अवधकिशोरदास यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी तिन्ही आखाड्यांतील साधू-महंत उपस्थित होते. निर्वाणी आखाड्याच्या लालतुरंगी खालशातही महंताई झाल्याचे कळते. उद्या (दि. ८) निर्मोही आखाड्यातील श्री पंच हरव्याषी संतोषी खालशाच्या महंतपदी वासुदेवजी यांच्या, तर निर्वाणी आखाड्यातील राजस्थानातील श्रीरामधाम आश्रमाचे श्री बजरंगाचार्याजी महाराज यांच्या महंताईचा कार्यक्रम होणार आहे.