शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

आमदारांच्या घरांवर आंदोलकांची धडक

By admin | Updated: November 3, 2015 23:21 IST

पाणीप्रश्नी सर्वपक्ष एकवटले : सानप, फरांदेंकडे घंटानाद, सीमा हिरेंकडे चहापान

नाशिक : गंगापूर धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडण्याबाबत सर्वपक्ष एकवटले असताना भाजपा आमदारांनी सोईस्कररीत्या मौन बाळगल्याने त्यांना ‘जागते’ करण्यासाठी सर्वपक्षीय कृती समितीने शहरातील तीनही भाजपा आमदारांच्या निवासस्थानी धडक मारली. आमदार बाळासाहेब सानप आणि आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्या घरासमोर घंटानाद करीत आंदोलकांनी घोषणाबाजी केली, तर आमदार सीमा हिरे यांच्या घरासमोर घंटानाद होण्यापूर्वीच हिरे यांनी आंदोलकांना सामोरे जात आपणही नाशिककरांबरोबरच असल्याची नि:संदिग्ध ग्वाही दिली. शिवाय मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी बुधवारी शिष्टमंडळ घेऊन जाण्याचेही स्पष्ट केले. जायकवाडीसाठी गंगापूर धरणातून पाणी सोडण्याचा मुद्दा पेटला असताना स्थानिक सत्ताधारी आमदार मात्र मौन बाळगून असल्याने त्यांना जागे करण्यासाठी आणि पाणीप्रश्नाची तीव्रता लक्षात आणून देण्यासाठी भाजपावगळता सर्वपक्षीय कृती समितीने तीनही आमदारांच्या घरांसमोर घंटानाद आंदोलन करण्याचे सोमवारी जाहीर केले होते. त्यानुसार सकाळी पुन्हा एकदा महापौरांच्या ‘रामायण’ निवासस्थानी सर्व पक्षांचे पदाधिकारी यांनी एकत्र येत प्रारंभी पंचवटीत पूर्व विभागाचे आमदार बाळासाहेब सानप यांच्या कृष्णनगर येथील निवासस्थानाकडे कूच केले. सानप यांच्या निवासस्थानवजा संपर्क कार्यालयासमोर सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांनी घंटानाद करीत प्रचंड घोषणाबाजी केली. ‘नाशिकचे पाणी पळविणाऱ्या भाजपा सरकारचा धिक्कार असो’, ‘भाजपा सरकार हाय हाय’, ‘मुख्यमंत्री-पालकमंत्री हाय हाय’, ‘जागे व्हा, आमदारसाहेब जागे व्हा’ या घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. सानप मात्र निवासस्थानी उपस्थित नव्हते.

हिरे यांनी साधले टायमिंग

सीमा हिरे यांनी स्थानिक अन्य भाजपा आमदारांच्या भूमिकेला छेद देत यापूर्वीही मुकणे पाणीप्रश्नी टायमिंग साधले होते. फरांदे व सानप हे दोघे मुकणे पाणीप्रश्नी वेगळी भूमिका मांडत असताना हिरे यांनी प्रारंभापासूनच मुकणे प्रकल्पाचे समर्थन केले होते. आताही पाणीप्रश्न पेटला असताना फरांदे व सानप यांच्याकडून कसलाही प्रतिसाद मिळाला नाही परंतु आमदार सीमा हिरे यांनी घरासमोर घंटा वाजण्यापूर्वीच आपली भूमिका स्पष्ट करत पुन्हा एकदा टायमिंग साधले. यावेळी आंदोलकांनीही हिरे या एकमेव आमदार नाशिककरांच्या बाजूने असल्याचे सांगत त्यांचे आभार मानले आणि सरकारदरबारी नाशिककरांची वकिली करण्याची विनंती केली.

आज मुख्यमंत्र्यांना भेटणार

आमदार बाळासाहेब सानप हे निवासस्थानी उपस्थित नव्हते, तर आमदार फरांदे या अद्याप विदेश दौऱ्यावरून परतल्या नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, आमदार सीमा हिरे यांनी आंदोलकांना सामोरे जात आपली भूमिका स्पष्ट केली. हिरे यांनी सांगितले, पाणीप्रश्नी मी नाशिककरां- सोबतच असून मुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आहे. बुधवारी (दि. ४) सर्वपक्षीय शिष्टमंडळासमवेत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना वस्तुस्थिती कथन केली जाईल. कोणत्याही परिस्थितीत नाशिकचे हक्काचे पाणी बाहेर जाऊ दिले जाणार नसल्याची ग्वाही देतानाच हिरे यांनी रामकुंडात ठाण मांडून आंदोलन करण्याची तयारीही दर्शविली.