शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलनकर्ते दोषी, मग रुग्णालये निर्दोष कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:13 IST

नाशिक शहरातील एका रुग्णालयाने कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णाचे देयक त्याच्या वैद्यकीय विम्याच्या रकमेतून वळती करून घेतल्यावरही त्याने भरलेली ...

नाशिक शहरातील एका रुग्णालयाने कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णाचे देयक त्याच्या वैद्यकीय विम्याच्या रकमेतून वळती करून घेतल्यावरही त्याने भरलेली अनामत रक्कम परत करण्यास नकार दिला. परिणामी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी रुग्णालय आवारात अर्धनग्न आंदोलन करून पैसे परत करण्यास भाग पाडले. रुग्णालयाने आंदोलन कर्त्यांविरुद्ध कोणतीही तक्रार पोलिसांत केली नाही, मात्र सार्वजनिक ठिकाणी अशांतता माजवून गोंधळ केल्याच्या कारणावरून पोलिसांनी आंदोलन कर्त्यांवर गुन्हा दाखल केला. कोरोना काळात संचारबंदी व जमावबंदी असतानाही गर्दी जमा केल्याचा हा गुन्हा असला तरी, अशी गर्दी जमा करण्यामागच्या कारणांची पोलिसांनी बहुधा मीमांसा केली नाही. मुळात साथरोग प्रतिबंधक व आपत्ती व्यवस्थापन कायदा जारी असताना तो रुग्ण, नातेवाईक, डॉक्टर व रुग्णालयांसाठी लागू आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांना आंदोलनास भाग पाडणाऱ्या रुग्णालयाने मुकाट्याने रुग्णाने भरलेली अनामत रक्कम परत करून अप्रत्यक्ष आपली चूक मान्य केली, याचाच अर्थ त्याने कळत न कळत कायद्याचे उल्लंघन केले आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलम १८८ मध्ये याचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. एखाद्या व्यक्ती अथवा व्यवस्थापनाच्या कृतीमुळे आरोग्य किंवा सुरक्षिततेला धोका पोहोचण्याचा संभव असेल, असे कृत्य कायद्याने गुन्हा मानून त्यासाठी सहा महिन्यांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद केली आहे. कायद्याचा याच तरतुदीचा विचार करायचा झाल्यास पैशांच्या कारणावरून आंदोलन करण्यास भाग पाडणाऱ्या रुग्णालयाने देखील कायद्याचा भंग केल्याचे स्पष्ट होत असताना पोलिसांनी मात्र या कायद्याचा विसर पाडून घेतला. एवढ्यावरच हे थांबले नाही तर अशाच कारणावरून आणखी एका षग्णालयाने आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांवर घटना घडून गेल्यानंतर आठवडाभराने पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी हा गुन्हा देखील तत्परतेने दाखल करून कायद्याच्या रक्षणप्रति असलेली निष्ठा सिद्ध केली. मात्र, उशिराने फिर्याद देणाऱ्या रुग्णालयाने देखील आपत्ती व्यवस्थापन व साथरोग नियंत्रण कायद्याचा भंग केल्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट होत असताना आंदोलन कर्त्यांबरोबरच गुन्हा करण्यास भाग पाडणाऱ्या रुग्णालयांवरही कारवाई करण्यास पोलिसांचे हात का कचरले? हे मात्र समजू शकले नाही.

-----