शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

प्रीमिअम दरवाढीस विरोध केल्याने आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 00:37 IST

महापालिकेने इमारत बांधकामासंबंधी प्रीमिअम दरवाढीचा पाठविलेला प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. या प्रीमिअम दरवाढीस भाजपाच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी विधानसभेत विरोध दर्शविल्याने त्याच्या निषेधार्थ शहर परिसरातील शेतकºयांनी शुक्रवारी (दि. २२) तपोवनातील साधुग्राममध्ये एकत्र येत आंदोलन केले. यावेळी शेतकºयांनी आमदार फरांदे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.

नाशिक : महापालिकेने इमारत बांधकामासंबंधी प्रीमिअम दरवाढीचा पाठविलेला प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. या प्रीमिअम दरवाढीस भाजपाच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी विधानसभेत विरोध दर्शविल्याने त्याच्या निषेधार्थ शहर परिसरातील शेतकºयांनी शुक्रवारी (दि. २२) तपोवनातील साधुग्राममध्ये एकत्र येत आंदोलन केले. यावेळी शेतकºयांनी आमदार फरांदे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.  महाराष्टÑ शासनाने शासकीय दराच्या ४० टक्के प्रीमिअम दराने एफएसआय विकण्याची मुभा महापालिकेस दिल्याने परिणामी, आरक्षणाखाली जमिनी गेलेल्या शेतकºयांच्या टीडीआरचे मूल्य कोसळले आहे. त्यामुळे शेतकºयांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले होते. त्यानंतर महापालिका आयुक्तांनी महाराष्टÑ शासनाकडे ७० ते ८० टक्के प्रीमिअम दरवाढीचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविलेला आहे. दरम्यान, नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात नाशिक मध्यच्या भाजपाच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी सदर दरवाढीस विरोध करण्याची भूमिका घेत दरवाढीचा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केली होती. आमदार फरांदे यांनी घेतलेल्या या भूमिकेच्या विरोधात शहर व परिसरातील शेतकºयांनी एकत्र येत तपोवनातील साधुग्राममध्ये आंदोलन केले आणि आमदार फरांदे यांचा निषेध केला. ‘प्रीमिअम वाढवा, शेतकरी वाचवा’ अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या.आंदोलनात शिवसेनेचे नगरसेवक दिलीप दातीर, केरू पाटील, राजाराम बोराडे, सोमनाथ बोराडे, छबूराव नागरे, बाळासाहेब विधाते, जयंत अडसरे, संजय पाटील, समाधान जेजूरकर, सुनील काठे, कुंदन मौले, ताराबाई मौले, महेंद्र जाधव, हिराबाई दातीर, विमल दातीर, भारती सरनाईक आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ‘जोडे मारो’ आंदोलनाचा प्रयत्न शेतकरी आंदोलकांनी आमदार देवयानी फरांदे यांची फ्लेक्सवर प्रतिमाही सोबत आणली होती. यावेळी प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्याचा प्रयत्न आंदोलकांनी करताच पोलिसांनी हस्तक्षेप करत प्रतिमा ताब्यात घेतली. त्यामुळे आंदोलकांचा प्रयत्न फसला.