शहरं
Join us  
Trending Stories
1
Porsche Car Accident: 'बाळा'च्या ब्लड सँपलची ससून रुग्णालयात अदलाबदल; ते खासगी इसम कोण?
2
नार्को टेस्ट करण्याची मागणी; दमानियांचे आव्हान अजित पवारांनी स्वीकारले, मात्र ठेवली 'ही' एक अट!
3
सांगवीत भररस्त्यात गोळ्या झाडून रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून 
4
27 हजार किलो स्फोटकांचा वापर; अवघ्या 6 महिन्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा बोगदा तयार
5
सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबाबत ही भाषा?; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वक्तव्याने दमानियांचा संताप, अजितदादांना म्हणाल्या...
6
Pune Porsche case: ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळेंना पाठवले तत्काळ सक्तीच्या रजेवर
7
९३० लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांचे अतोनात हाल होणार; ३ दिवस जम्बो ब्लॉक
8
"कोण आहेत मणिशंकर अय्यर, आमचा संबंध नाही", 'त्या' वक्तव्यामुळे काँग्रेसने हात झटकले...
9
सोशल मीडियावर रंगला नवा वाद; 'All Eyes on Rafah' आहे तरी काय? जाणून घ्या...
10
"तब्येत बरी नसती तर…’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाव्याला नवीन पटनाईक यांनी दिलं असं प्रत्युत्तर
11
आला रे आला! पुढील २४ तासात मान्सूनची एन्ट्री; कोणत्या राज्यात कधी पाऊस कोसळणार?
12
मनातून मनुस्मृती जाळणं गरजेचं; 'ती' चूक होताच प्रकाश आंबेडकर आव्हाडांवर संतापले!
13
T20 World Cup च्या तोंडावर ICC कडून पाकिस्तानी खेळाडूंना खुशखबर; 'सूर्या'चा दबदबा कायम
14
रतन टाटांचा एक आदेश अन् 'ताज हॉटेल'मध्ये भटका कुत्रा निवांत झोप घेतो तेव्हा...
15
तिसऱ्यांदा सरकार आलं तर सर्वात पहिले कोणत्या देशात जाणार PM मोदी? परराष्ट्र मंत्रालय सेट करतंय कार्यक्रम
16
Fact Check: पाकिस्तानला ५ हजार कोटींचे कर्ज देण्याची घोषणा राहुल गांधींनी केलेलीच नाही; 'तो' मेसेज खोटा
17
₹3 चा स्टॉक असलेली कंपनी 20 फ्री शेअर वाटणार, गुंतवणूकदारांना मालामाल करणार! LIC कडे 97 लाख शेअर
18
आतापर्यंतचे सर्व ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणारे २ शिलेदार; रोहितचा 'नाना' विक्रमांवर डोळा!
19
‘’एका वर्षात नवीन पटनाईक यांची तब्येत एवढी कशी बिघडली, काही कट आहे का?’’, मोदींनी व्यक्त केली शंका
20
IndiGo कडून आता महिला प्रवाशांना फ्लाइट बुकिंगदरम्यान मिळणार खास सुविधा

शिवसेना, मनसेकडून निषेध आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2020 9:16 PM

नाशिक : कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा रातोरात हटविल्याचे पडसाद शहरातही उमटले. शिवसनेच्या वतीने शालिमार चौकातील मध्यवर्ती कार्यालयासमोर कर्नाटक सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले, तर मनसेच्या वतीने पाथर्डीफाटा येथे ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले. अनेक संघटनांनीदेखील कर्नाटक सरकारचा निषेध नोंदविला आहे.

ठळक मुद्देपालकमंत्री भुजबळ यांनी नोंदविला निषेध

नाशिक : कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा रातोरात हटविल्याचे पडसाद शहरातही उमटले. शिवसनेच्या वतीने शालिमार चौकातील मध्यवर्ती कार्यालयासमोर कर्नाटक सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले, तर मनसेच्या वतीने पाथर्डीफाटा येथे ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले. अनेक संघटनांनीदेखील कर्नाटक सरकारचा निषेध नोंदविला आहे.कर्नाटक मध्ये असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांच पुतळा कर्नाटक सरकारच्या आदेशानंतर हटविण्यात आला. रात्रीच्या सुमारास कारवाई करीत पुतळा हटविण्यात आल्याने कर्नाटकमध्येही या घटनेचा निषेध करण्यात आला. महाराष्ट्रातदेखील या घटनेचा ठिकठिकाणी निषेध करण्यात येत आहे. नाशिकमध्ये शिवसेना आणि मनसेने आंदोलन करीत निषेध नोंदविला. शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सचिन मराठे, अजय बोरस्ते, सचिन बांडे, विलास शिंदे, नाना काळे, उमेश मराठे, संतोष गायकवाड, सुधाकर बडगुजर, हरिभाऊ काळे आदींसह कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले.पाथर्डीफाटा येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. कर्नाटक सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याला ‘जोडे मारो’ आंदोलन करून पुतळा दहन करण्यात आले. महाराजांचा पुतळा पुन्हा त्याच जागी सन्मानाने बसविला नाही, तर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला. आंदोलनात अजिंक्य बोडके, ललित वाघ, अजिंक्य शिर्के, शंकर कणकुसे, ओमकार पवार, अक्षय माळी, तुषार कदम, संज्योत भाटी, अनिकेत झिटे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.पालकमंत्री भुजबळ यांनी नोंदविला निषेधबेळगाव जिल्'ातील मनगुत्ती या गावामध्ये महाराष्टÑाचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जाणीवपूर्वक व सुडबुद्धीने हटविण्यात आला असून, या घटनेचा निषेध करीत असल्याची प्रतिक्रिया अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा जिल्'ाचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. कर्नाटक सरकारने संबंधितांवर कडक कारवाई करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची सन्मानाने पुनर्र्स्थापना करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

टॅग्स :belgaum-pcबेळगावShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज