नाशिक : शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला असून, रविवार पेठेत एकाच दिवशी फोडण्यात आलेली सहा व्यापारी दुकाने, दुचाकी चोरी, महिलांच्या अंगावरील दागिन्यांची चोरी, जबरी लूट, महिलांवरील अत्याचार वाढले आहेत़ पोलीस प्रशासन कायदा व सुव्यस्था राखण्यास अयशस्वी ठरत असल्याच्या निषेधार्थ शनिवारी रविवार कारंजावर भारतीय जनता पार्टीच्या व्यापारी आघाडीतर्फे आंदोलन करण्यात आले़चोरीचा प्रकार सुरू असताना पोलिसांचे गस्तीपथक कुठे होते, याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, मुख्य बाजारपेठांमध्ये गस्त वाढवावी, सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, व्यापारी व पोलीस प्रशासनाची संयुक्त बैठक घ्यावी या मागण्यांचे निवेदन पोलिसांना देण्यात आले़ आंदोलनात शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, नगरसेवक देवयानी फरांदे, सीमा हिरे, व्यापारी आघाडी परिषदेचे अध्यक्ष मिलिंद भूमकर, मयूर सराफ , नीलेश बोरा, नीलेश बाफ णा, प्रकाश दीक्षित, अॅड़ अजिंक्य साने, देवदत्त जोशी, गणेश कांबळे, बबलूसिंह परदेशी, आशिष नहार आदिंसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते़ (प्रतिनिधी)
कायदा व सुव्यस्था राखण्यास अयशस्वी ठरत असल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या व्यापारी आघाडीतर्फे आंदोलन
By admin | Updated: July 20, 2014 01:43 IST