शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पेस्ट कंट्रोलच्या ठेक्याला ९४ नगरसेवकांचा विरोध

By admin | Updated: January 23, 2015 23:10 IST

प्रस्तावात त्रुटी : पालिकेमार्फतच काम करण्याची मागणी

नाशिक : डास प्रतिबंधक धूर व औषध फवारणीकरिता अर्थात पेस्ट कंट्रोलचा तीन वर्षांसाठी साडेसोळा कोटी रुपयांचा ठेका देण्यास नगरसेवकांचा विरोध असतानाही महापौरांनी प्रशासनाच्या प्रस्तावास मंजुरी दिल्यानंतर आता सभागृहाबाहेर पेस्ट कंट्रोलच्या ठेक्याविरुद्ध तब्बल ९४ नगरसेवक एकवटले असून, त्यांनी खासगी ठेकेदारास ठेका देण्यास विरोध दर्शविणारे पत्र आयुक्तांना दिले आहे. याचबरोबर मागील वर्षी ठेकेदाराच्या मूळ निविदेपेक्षा यंदा अडीचपट रकमेचे प्राकलन ठेवण्यात आल्याने सदस्यांनी संशय व्यक्त केला असून, प्रस्तावात अनेक त्रुटी असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, पालिकेनेच सदर काम पालिका आणि संबंधित ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांमार्फत करून घ्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.पेस्ट कंट्रोलच्या ठेकेदाराला तेरा वेळा महासभेच्या मंजुरीविना मुदतवाढीचा प्रस्ताव गाजत असतानाच आयुक्तांनी नव्याने ठेका देण्याचा प्रस्ताव दि. २० जानेवारीला झालेल्या महासभेत मांडला होता. यात तीन वर्षांसाठी निविदा पद्धतीने काम करण्यास प्रशासकीय मंजुरीसाठी १६.५० कोटी रुपयांच्या प्राकलनाचा विषय चर्चेला आला. सदस्यांनी सदर कामाचा पुन्हा ठेका न काढता महापालिकेनेच संबंधित ठेकेदाराकडे असलेले कर्मचारी मानधनावर अथवा किमान वेतनावर पालिकेच्या सेवेत घ्यावे आणि काम करावे, त्यातून महापालिकेची मोठी बचत होणार असल्याचा दावा सदस्यांनी केला होता, परंतु संबंधित कर्मचाऱ्यांना पालिका सेवेत घेण्याबाबत शासनाची मान्यता घ्यावी लागणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट करत निविदा पद्धतीनेच ठेका काढण्याला संमती देण्याचे सांगितले होते. सदस्यांचा विरोध असतानाही महापौरांनी तीन वर्षांसाठी निविदा पद्धतीने ठेका देण्यास संमती दिली आणि कर्मचाऱ्यांना मनपा सेवेत सामावून घेण्याबाबत आयुक्तांनी शासनाकडे परवानगी मागावी, अशी सूचना केली होती. महासभेत निर्णय झाल्यानंतर मात्र आता सभागृहाबाहेर पेस्ट कंट्रोलच्या ठेक्याविरोधात सर्वपक्षीय नगरसेवक एकवटले असून, तब्बल ९४ नगरसेवकांनी आयुक्तांना पत्र देत विरोध दर्शविला आहे. (प्रतिनिधी)