शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षारक्षक वेतनापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 00:47 IST

महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे कार्यरत असलेल्या ४९ सुरक्षारक्षकांना डिसेंबर २०१६ पासून वेतन नसल्याने संबंधितांच्या कुटुंबीयांची परवड होत आहे. न्यायालयाच्या निकालानंतरही शिक्षण विभागामार्फत वेतन अदा करण्यासंबंधी कार्यवाही झालेली नाही. दरम्यान, सदर सुरक्षारक्षकांच्या वेतनासंबंधीची व सेवेत घेण्याविषयीची फाइल आयुक्तांच्या स्वाक्षरीअभावी प्रलंबित असल्याचे सांगितले जात आहे.

नाशिक : महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे कार्यरत असलेल्या ४९ सुरक्षारक्षकांना डिसेंबर २०१६ पासून वेतन नसल्याने संबंधितांच्या कुटुंबीयांची परवड होत आहे. न्यायालयाच्या निकालानंतरही शिक्षण विभागामार्फत वेतन अदा करण्यासंबंधी कार्यवाही झालेली नाही. दरम्यान, सदर सुरक्षारक्षकांच्या वेतनासंबंधीची व सेवेत घेण्याविषयीची फाइल आयुक्तांच्या स्वाक्षरीअभावी प्रलंबित असल्याचे सांगितले जात आहे.महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे सन १९९८ पासून ५३ सुरक्षारक्षक सेवेत आहेत. संबंधित सुरक्षारक्षकांना मनपा सेवेत सामावून घेण्याबाबत कामगार न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंतची लढाई लढली गेली. न्यायालयाच्या निर्देशानुसार, सदर सुरक्षारक्षकांना तत्काळ सेवेत सामावून घेण्याबरोबरच त्यांना नियमित वेतन अदा करण्याची जबाबदारी शिक्षण विभागाची आहे. परंतु, डिसेंबर २०१६ पासून ४९ सुरक्षारक्षकांचे वेतनच अदा झालेले नाही. दरमहा वेतन व्हावे, यासाठी संबंधित सुरक्षारक्षकांकडून वारंवार महापालिकेत चकराही मारल्या जात आहेत. परंतु, वेगवेगळी कारणे देऊन त्यांची बोळवण केली जात असल्याची तक्रार आहे. सेवेत घेण्याबाबतची फाइल विधी विभागाकडे प्रलंबित असल्याचे सांगितले जाते. परंतु, विधी विभागाने आपला अभिप्राय ५ जुलै २०१७ रोजी देऊनही वेतनाबाबतची कार्यवाही पुढे सरकली नाही. त्यामुळे, संबंधित सुरक्षारक्षकांची दिवाळीही वेतनाविनाच गेली. गेल्या अकरा महिन्यांपासून वेतन होत नसल्याने सुरक्षारक्षकांच्या कुटुंबीयांची आर्थिक परवड होत आहे. दरम्यान, आता आयुक्तांकडे सदर फाइल प्रलंबित असल्याचे सांगितले जात आहे. पालिकेच्या दुर्लक्षामुळे सुरक्षा रक्षकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.