शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

संरक्षित मंदिरांचा ठेवा ढासळला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 00:55 IST

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगेच्या पायथ्याशी असलेल्या अंजनेरी गावातील सुमारे एक हजार वर्षांहून अधिक प्राचीन हेमाडपंती जैन व हिंदू मंदिरांचा दुर्मीळ ठेवा नामशेष होत आहे. स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या मंदिरांच्या संरक्षणासाठी आणि या वास्तू जतन करण्यासाठी गेल्या वर्षी सुमारे १६ कोटी ७५ लाखांचा निधी केंद्राकडून मंजूर करण्यात आला आहे

अझहर शेख ।त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगेच्या पायथ्याशी असलेल्या अंजनेरी गावातील सुमारे एक हजार वर्षांहून अधिक प्राचीन हेमाडपंती जैन व हिंदू मंदिरांचा दुर्मीळ ठेवा नामशेष होत आहे. स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या मंदिरांच्या संरक्षणासाठी आणि या वास्तू जतन करण्यासाठी गेल्या वर्षी सुमारे १६ कोटी ७५ लाखांचा निधी केंद्राकडून मंजूर करण्यात आला आहे; मात्र अद्यापही कामाला सुरुवात झालेली नाही. येथील १६ अत्यंत दुर्मिळ अशा हेमाडपंती मंदिरांच्या पुनर्विकासाच्या कामाला अजूनही मुहूर्त मिळत नसल्याने मंदिरांची पडझड मोठ्या प्रमाणात सुरूच आहे.रामायणात अंजनीपुत्र हनुमानाचे जन्मस्थळ होण्याचा अभिमान बाळगणाºया तर यादवकाळात त्या क्षेत्राच्या राजधानीचा नावलौकिक तीर्थक्षेत्र अंजनेरी गावाने मिळविला आहे. येथील सुमारे एक हजार वर्षांहून अधिक पुरातन हेमाडपंती मंदिरे अखेरच्या घटका मोजत आजही इतिहासाचे साक्षीदार म्हणून लक्ष वेधून घेतात; मात्र भारतीय पुरातत्व खात्याचे अद्याप या मंदिरांकडे लक्ष न गेल्यामुळे संरक्षित वारसा म्हणून घोषित केलेल्या व बांधकामाच्या दृष्टीने अत्यंत नाजूक समजल्या जाणाºया मंदिरांची पडझड पुरातत्व विभागाच्या संरक्षण कुंपणामध्येच सुरू आहे.त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सह्याद्रीच्या अंजनगिरी पर्वतरांगेच्या कुशीत वसलेल्या अंजनेरी गावात प्राचीन हेमाडपंती स्थापत्यकलेचा नमुना या मंदिरांच्या रुपाने आजही पहावयास मिळतो. पावसाळ्यात निसर्गाची मुक्त हस्ते होणारी सौंदर्याची उधळण आणि धरणीने पांघारलेला हिरवा शालू व अंजनगिरीवर होणारा पावसाच्या सरींचा जलाभिषेक अशा निसर्गरम्या वातावरणात आजच्या तरुणपिढीला जीर्ण व पडझड झालेल्या मंदिरांच्या दुर्मीळ स्थापत्यकलेसोबत ‘सेल्फी’चा मोह आवरणे शक्य होत नाही. पर्यटकांसह तरुणाईचे येथे गर्दी लोटते. आगळ्या वेगळ्या बांधकाम शैलीमधील जैन व हिंदू मंदिरांचा दुर्मीळ ठेवा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्र्यंबकेश्वरपासून सहा किलोमीटर अलीकडे असलेले अंजनेरी तीर्थक्षेत्र एकेकाळी जैन धर्मीय समाजबांधवांची वसाहत म्हणूनदेखील ओळखले जात होते. या अंजनेरी गावाच्या वेशीवर असलेल्या विविध जैन व हिंदू धर्मीय हेमाडपंती पुरातन मंदिरे आजही गौरवशाली धार्मिक इतिहासाची साक्ष देतात. येथील मंदिरांमध्ये आढळलेल्या शिलालेखावरील उल्लेखानुसार इसवी सन ११४२ (शके १०६३)मध्ये यादवकालीन राजाच्या एका मंत्र्याकडून येथील पुरातन मंदिरांचा जीर्णोद्धाराचा प्रयत्न झाल्याचे पुरावे आढळतात. तसेच १७०८ साली जेव्हा अंजनेरी राजधानी मराठा पेशव्यांच्या साम्राज्यात विलीन झाली तेव्हादेखील येथील मंदिरांच्या विकासाचा प्रयत्न झाल्याचे बोलले जाते.