शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

अल्पसंख्याकांना संरक्षण द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 00:18 IST

नाशिक : देशातील विविध भागांत गोरक्षणाच्या नावाखाली दलित, मुस्लीम व अन्य अल्पसंख्याक समुदायाच्या नागरिकांवर हल्ले होत असल्याने अल्पसंख्याकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्यामध्ये सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी हल्लेखोरांवर मोकोको कायद्याअंतर्गत कारवाई करून अल्पसंख्याकांना संरक्षण देण्याची मागणी मालेगावचे आमदार तथा इन्सानियत बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष असिफ शेख यांनी केली आहे.

नाशिक : देशातील विविध भागांत गोरक्षणाच्या नावाखाली दलित, मुस्लीम व अन्य अल्पसंख्याक समुदायाच्या नागरिकांवर हल्ले होत असल्याने अल्पसंख्याकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्यामध्ये सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी हल्लेखोरांवर मोकोको कायद्याअंतर्गत कारवाई करून अल्पसंख्याकांना संरक्षण देण्याची मागणी मालेगावचे आमदार तथा इन्सानियत बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष असिफ शेख यांनी केली आहे.  आमदार रशिद शेख यांच्या नेतृत्वात इन्सानियत बचाव, लोकशाही बचाव संघर्ष समितीने मालेगाव ते नाशिक पदयात्रा काढून देशभरातील अल्पसंख्याकांवर होणाºया हल्ल्यांचा निषेध नोंदवला. तसेच हल्लेखोरांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकाºयांना निवेदनही देण्यात आले. या निवेदनाच्या माध्यमातून हाफिज जुनैद याची रेल्वेमध्ये हत्या झाल्याने अल्पसंख्याक समुदायामध्ये भीतीचे वातावरण पसरले असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.मालेगाव येथील शहीद चौैकातून १५ आॅगस्ट रोजी काढलेली पदयात्रा सुमारे ११० कि लोमीटर अंतर चालून शनिवारी (दि.१९) नाशिक येथील हुतात्मा स्मारकात पोहोचली. या भगवान आढाव, लतिफ बागवान, विठ्ठल बर्वे, अब्दुल कय्यम, शहजाद अख्तर, अब्दुल सिद्दीकी यांच्यासह नाशिकमधील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक वसंत हुदलीकर, पंडित येलमामे, दगडूशा कलाल, सरस्वती पाटील, सरस्वती मोरे, विमल अचावणे यांनीही सहभाग घेतला. तसेच काँगेसचे शहराध्यक्ष शरद अहेर, हेमलता पाटील, बबलू खैरे यांच्यासह छात्रभारतीचे सागर निकम, समाधान बागुल, मंगेश साबळे आदींनीही या पदयात्रेत सहभाग घेतला.प्रतिबंधात्मक कारवाईची मागणी गोरक्षणाच्या नावाखाली मुस्लीम व दलित समुदायांवर हल्ले करून काही पक्ष व जातीयवादी संघटना एकधर्मी राष्ट्र निर्माण करू पाहत आहेत. असे प्रकार थांबविण्यासाठी संसदेत व विधिमंडळात कडक कायदा अस्तित्वात आणण्याच्या मागणीसह अशा संघटनांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणीही यावेळी पदयात्रेत सहभागी झालेल्या आंदोलकांनी केली. आंदोलकांचा ठिय्याच्मालेगाव येथून पदयात्रेने नाशिकपर्यंत आलेल्या इन्सानियत बचाव संघर्ष समितीच्या आंदोलकांनी थेट जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्याचा आग्रह केला. परंतु, जिल्हाधिकारी उपलब्ध नसल्याने आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालय आवारातच ठिय्या आंदोलन सुरू केले. अखेर निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी मध्यस्थी करून निवेदन स्वीकारून तिढा सोडवला.