शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

प्रस्तावित अ‍ॅडव्होकेट अ‍ॅक्टची होळी

By admin | Updated: April 22, 2017 00:24 IST

नाशिक : अ‍ॅडव्होकेट अ‍ॅक्टमध्ये सुचविण्यात आलेल्या दुरुस्तीच्या विरोधात जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोर प्रस्तावित अ‍ॅक्टच्या प्रती जाळून निषेध व्यक्त केला़

 नाशिक : अ‍ॅडव्होकेट अ‍ॅक्टमध्ये सुचविण्यात आलेल्या दुरुस्तीच्या विरोधात बार कौन्सिल आॅफ इंडियाने केलेल्या आवाहनानुसार जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोर दुपारी प्रस्तावित अ‍ॅडव्होकेट अ‍ॅक्ट (अ‍ॅमेन्डमेंट््स - २०१७) च्या प्रती जाळून निषेध व्यक्त केला़ यानंतर जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांना निवेदन दिले़ दरम्यान, दुपारच्या सुटीनंतर वकिलांनी कामकाजात सहभाग न घेतल्याने फौजदारी खटल्याचे कामकाज वगळता दिवाणी न्यायालयाचे कामकाम बंद होते़महाराष्ट्र गोवा बार कौन्सिचे सदस्य अ‍ॅडव्होकेट अविनाश भिडे यांनी यावेळी सांगितले की, सरकारने अ‍ॅडव्होकेट अ‍ॅक्टमध्ये ज्या प्रस्तावित दुरुस्त्या सुचविल्या आहेत त्या वकिलांवर अन्याय करणाऱ्या असून, लोकशाही मूल्यांची पायमल्ली करणाऱ्या आहेत़ या अ‍ॅक्टमध्ये बार कौन्सिल मेंबरची संख्या २१ करण्यात आली असून, त्यापैकी दहा हे मतदान पद्धतीने, तर ११ सदस्य हे निवड पद्धतीने घेतले जाणार आहेत़ याबरोबरच गैरवर्तन करणाऱ्या वकिलांवरील कारवाईच्या चौकशीसाठी पाच सदस्यांची कमिटी स्थापन करण्यात येणार असून, त्यामध्ये दोन वकील, एक सेवानिवृत्त न्यायाधीश तर इतर दोन डॉक्टर व वास्तुविशारद यांचा समावेश असून, त्यांच्याकडून वकिलांना न्याय मिळणार नाही़ वकिलांना ग्राहक कायद्याखाली आणून त्यांच्यावर कारवाई होणार असून, दंडाची रक्कमही अवास्तव पद्धतीने आकारली जाणार आहे़ या कायद्याचा फटका केवळ वकिलांनाच नाही तर पक्षकारांनाही बसणार आहे़ त्यामुळे हे केवळ वकिलांचे आदोलन नाही तर पक्षकारांनीही यामध्ये सामील होणे गरजेचे असल्याचे भिडे यांनी सांगितले़जिल्हा न्यायालयाबाहेर करण्यात आलेल्या या आंदोलनात अ‍ॅड़ दिलीप वनारसे, अ‍ॅड़ बाळासाहेब आडके, अ‍ॅड़ सुरेश निफाडे, अ‍ॅड़जालिंदर ताडगे, अ‍ॅड़ मंगला शेजवळ, अ‍ॅड़ वर्षा एखंडे, अ‍ॅड़ संजय गिते आदींसह महिला व पुरुष वकील उपस्थित होते़ (प्रतिनिधी)