शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
2
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
3
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
4
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
5
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
6
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
7
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
8
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
9
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
10
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
11
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
12
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
13
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
14
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
15
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
16
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
17
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
18
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
19
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
20
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)

झोपडपट्टी पुनर्विकास योजनेचा प्रस्ताव

By admin | Updated: November 19, 2015 00:22 IST

विकास आराखड्यात समावेश : १४.४५ टक्के लोकांचे झोपडीत वास्तव्य

नाशिक : शहरातील १६८ झोपडपट्ट्यांमध्ये एकूण लोकसंख्येच्या तुलनेत १४.४५ टक्के लोक वास्तव्यास असून, झोपडपट्टीमुक्त शहराची संकल्पना साकारण्यासाठी नुकत्याच सादर झालेल्या सुधारित शहर विकास आराखड्यात मुंबईच्या धर्तीवर खासगी भागिदारीतून ‘झोपडपट्टी पुनर्विकास योजना’ राबविणे शक्य असल्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या प्रस्तावामुळे झोपडीधारकांऐवजी भूमाफियांना ‘अच्छे दिन’ येण्याची चर्चा सुरू झाली आहे. नाशिक शहरात सद्यस्थितीत १६८ झोपडपट्ट्या असून, त्यातील केवळ ५६ झोपडपट्ट्या स्लम म्हणून घोषित झाल्या आहेत, तर ११२ झोपडपट्ट्या अनधिकृत आहेत. प्रामुख्याने, शहरातील गोदावरी आणि नासर्डी नदीकिनारी, तसेच कॅनॉलरोडलगत आणि रेल्वेस्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणावर झोपडपट्ट्या उभ्या राहिल्या आहेत. त्यातील सर्वाधिक झोपडपट्ट्या या खासगी आणि सरकारी जागेत थाटल्या गेल्या आहेत. शहरातील सहा विभागांपैकी पंचवटी विभागात सर्वाधिक ४६ झोपडपट्ट्या असून, सुमारे ५२ हजार लोक झोपडीत वास्तव्यास आहेत. त्यातील केवळ १५ झोपडपट्ट्या स्लम घोषित आहेत. उर्वरित ३१ अनधिकृत आहेत. शहरातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत १४.४५ टक्के म्हणजे २ लाख १४ हजार ७६९ लोक हे झोपड्यांमध्ये वास्तव्य करून आहेत. महापालिकेच्या आकडेवारीनुसार एकूण ४२ हजार ७४२ झोपडीधारक आहेत. सर्वाधिक झोपड्या या खासगी जागेवर असून, त्यांची संख्या २३ हजार २३५ इतकी आहे. तर सरकारी जागेवर ११ हजार ३७६ झोपड्या आहेत. नाशिक महापालिकेच्या मालकीच्या भूखंडावर ८१३१ झोपडीधारक आहेत. खासगी जागेतील झोपड्यांमध्ये सर्वाधिक १ लाख १७ हजार ६७६ लोक वास्तव्यास आहेत. त्याखालोखाल सरकारी जागेतील झोपड्यांमध्ये ५६ हजार ४९२, तर महापालिकेच्या भूखंडांवर ४० हजार ६०१ लोकांचे वास्तव्य आहे. झोपडीमुक्त शहर व्हावे, यासाठी महापालिकेने जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनरुत्थान योजनेअंतर्गत सुमारे १६ हजार घरकुलांची योजना हाती घेतली होती; परंतु त्यातील केवळ साडेसात हजार घरकुलांचाच टप्पा महापालिका गाठू शकणार असून, अजूनही सदर योजना चाचपडतच आहे. नगररचना विभागाने नुकत्यात जाहीर केलेल्या सुधारित विकास आराखड्यात झोपडीमुक्त शहरासाठी ‘झोपडपट्टी पुनर्विकास योजना’ खासगी भागिदारी (प्रायव्हेट पार्टनरशिप) मधून राबविण्याचा प्रस्ताव पुढे करण्यात आला आहे. सदर प्रस्ताव राबविल्यास झोपडीधारकांना मोफत घरे देणे शक्य होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यासाठी एक यंत्रणा स्थापित करण्याचीही सूचना करण्यात आली आहे. मात्र, शहरातील अनेक सरकारी व खासगी भूखंड हे भूमाफियांनी बळकाविले असून, या योजनेचा फायदा झोपडीधारकांऐवजी भूमाफियांकडूनच उचलला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.