शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
2
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
3
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
4
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
5
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
6
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
7
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
8
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
9
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
10
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
11
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
12
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
13
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
14
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
15
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
16
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
17
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
18
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
19
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?

प्रस्ताव राज्य शासनाच्या नगरविकास खात्याने फेटाळला

By admin | Updated: September 20, 2014 00:33 IST

प्रस्ताव राज्य शासनाच्या नगरविकास खात्याने फेटाळला

नाशिक : पंचवटीत साधुग्रामसाठी सत्वर जागा ताब्यात मिळाव्यात यासाठी महापालिकेने एकास दहा म्हणजे दहापट टीडीआर देण्याचा पाठविलेला प्रस्ताव राज्य शासनाच्या नगरविकास खात्याने फेटाळला आहे. आणि येत्या ९० दिवसांत फेरप्रस्ताव पाठविण्याचे आदेश दिले आहेत.कुंभमेळ्यासाठी ३२३ एकर क्षेत्र साधुग्राम म्हणून आरक्षित करण्यात येणार आहे. त्यापैकी पालिकेच्या मालकीचे ५४ हे. क्षेत्र असून, उर्वरित क्षेत्राचे तीन भाग पाडून त्यानुसार आरक्षणासाठी हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या होत्या. ३२३ एकर क्षेत्राचे भूसंपादन करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी लागणार असून, इतक्या मोठ्या प्रमाणात मोबदला देण्याइतपत महापालिकेची क्षमताच नाही. महापालिकेने तसे राज्य शासनाला कळविले होते. गेल्यावर्षी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत साधुग्रामकरिता जागा ताब्यात घेण्यासाठी जमीनमालकांना नियमित टीडीआरपेक्षा अधिक बोनस टीडीआर देण्याचा विचार मांडला होता. त्यानुसार महापालिकेकडून प्रस्ताव मागविण्यात आला होता. महापालिकेच्या महासभेत त्यानुसार एकास दहा म्हणजे दहापट टीडीआर देण्याचा निर्णय घेण्यात आला. सदरचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविल्यानंतर आता २८ आॅगस्ट रोजी राज्य शासनाने हा प्रस्ताव फेटाळला आहे. महापालिकेने फेरप्रस्ताव सादर करताना त्याच्या पुष्ट्यर्थ सबळ कारणे देण्यासही सांगितले आहे. येत्या ९० दिवसांत हा निर्णय महापालिकेने घ्यावा, त्यानंतर हरकती आणि सूचनांची कार्यवाही करून अंतिमत: प्रसिद्धी द्यावी, असे नमूद करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)