शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

‘पीटीसी’समोरील जागेवर महापालिकेच्या नावाचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 00:14 IST

मध्यवर्ती प्रशासकीय इमारत व तत्सम शासकीय कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी त्र्यंबकरोडवरील पोलीस अकादमी समोरच्या वादग्रस्त भूखंडाच्या मोबदल्यात महापालिकेकडून कोट्यवधी रुपये किमतीचा टीडीआर घेणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाकडून टीडीआर व रोख स्वरूपातील मोबदला वसूल करावा, असा प्रस्ताव येत्या महासभेवर ठेवण्यात आला आहे. या भूखंडाचा निकाल सरकारच्या बाजूने लागल्यामुळे भाजप गटनेते जगदीश पाटील यांनी हा प्रस्ताव महासभेवर दिला आहे.

ठळक मुद्देपाटील : बांधकाम व्यावसायिकाकडून टीडीआर वसूल करणार

नाशिक : मध्यवर्ती प्रशासकीय इमारत व तत्सम शासकीय कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी त्र्यंबकरोडवरील पोलीस अकादमी समोरच्या वादग्रस्त भूखंडाच्या मोबदल्यात महापालिकेकडून कोट्यवधी रुपये किमतीचा टीडीआर घेणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाकडून टीडीआर व रोख स्वरूपातील मोबदला वसूल करावा, असा प्रस्ताव येत्या महासभेवर ठेवण्यात आला आहे. या भूखंडाचा निकाल सरकारच्या बाजूने लागल्यामुळे भाजप गटनेते जगदीश पाटील यांनी हा प्रस्ताव महासभेवर दिला आहे.त्र्यंबकरोडवरील सर्व्हे क्रमांक ७५०, ७५१ व ७५५ मधील सुमारे २५ हेक्टर जागा असून, या जमिनीवर शहर विकास आराखड्यात मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसह विविध प्रकारची नऊ आरक्षणे टाकण्यात आली होती. परंतु नेहमीच वादग्रस्त ठरलेल्या या जागेचा वाद सरकार दरबारातून थेट उच्च न्यायालयातही पोहचला. त्यातून अनेक गुंतागुंत निर्माण होऊन या जागेवरील आरक्षणे उठविण्यात तर प्रसंगी बदलण्यातही आली. या जागेच्या बदल्यात महापालिकेने काही प्रमाणात मोबदला अदा केला. त्याच प्रमाणे टीडीआरही दिला.दरम्यान, मनपाच्या शोध मोहिमेत सदरची आरक्षित जागा कमाल जमीन धारणा कायद्यानुसार अतिरिक्त होत असल्याने ती जागा महापालिकेला मोफत मिळणे अपेक्षित असताना उलट पालिकेकडे मोबदल्याची मागणी करण्यात आल्याची बाब समोर आली. त्यानंतर मात्र जागेचा चुकीच्या पद्धतीने व्यवहार होण्याची शक्यता असल्याने मिळकत विभागाने महसूल, मुद्रांक जिल्हाधिकारी, मुद्रांक विभागाच्या सचिवांशी पत्रव्यवहार करून महापालिकेला विचारात घेतल्याशिवाय जागेचा व्यवहार करू नये, अशी विनंती केली आहे.तर आता दुसरीकडे महासभेतच सदर जागेवर महापालिकेचे नाव लावण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून, यापूर्वी देण्यात आलेला मोबदला वसूल करण्याची व त्या भूखंडावर महापालिकेचे नाव लावण्याची मागणी भाजप गटनेते जगदीश पाटील यांनी प्रस्तावाद्वारे केली आहे.मालकी हक्काचा दावामहापालिकेच्या मिळकत विभागाने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून दाव्यावर आक्षेप घेतला. न्यायालयाने कागदपत्रांची छाननी करूनजागेवर मालकी हक्काचा दावा करणाºया याचिकाकर्त्यांना मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी मुदत दिली. परंतु संबंधितांना मालकी हक्क सिद्ध करता न आल्याने न्यायालयाने सदरचा दावा फेटाळला.

टॅग्स :nmmcनवी मुंबई महापालिका