शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

चणकापूर उजव्या कालव्याच्या वहनक्षमता वाढीचा प्रस्ताव

By admin | Updated: December 31, 2015 22:14 IST

चणकापूर उजव्या कालव्याच्या वहनक्षमता वाढीचा प्रस्ताव

 देवळा : तालुक्याचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी चणकापूर उजव्या कालव्याच्या वहनक्षमतेत वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला असून, अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात तरतूद करून मार्च महिन्याअखेरपर्यंत हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल, अशी माहिती आमदार डॉ. राहुल अहेर यांनी देवळा येथे आयोजित जनता दरबारात दिली. यावेळी तालुक्यातील जनतेने कृषी विभाग, वीज कंपनी, महसूल विभाग आदि विभागांविषयी तक्रारीचा पाढा वाचला. महसूल विभाग, पोलीस ठाणे व जनतेची एक संयुक्तरीत्या गिरणा नदीपात्रातून होणारा अवैध वाळू उपसा बंद करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद कृषी सभापती केदा अहेर, महिला बालकल्याण सभापती उषाताई बच्छाव, सभापती केदा शिरसाठ, उपविभागीय अधिकारी भीमराव दराडे उपस्थित होते. चणकापूर कालव्याची वहनक्षमता वाढविणे, मशाड नाल्याचे पाणी उजव्या कालव्यात टाकणे, रामेश्वर ते झाडीपर्यंतच्या कालव्याच्या कामापैकी ३२ ते ३५ किमीच्या कामाची रद्द झालेली निविदा काढण्यात आली असून, उर्वरित दोन प्रस्तावाना येत्या तीन महिन्याच्या आत मंजुरी मिळवून हाती घेण्यात येणार आहे. आंदोलकर्त्यांनी दहीवडपासून पुढील कालव्याच्या कामास जे अडथळा आणत आहेत त्यांची समजूत काढण्याचे आवाहन यावेळी आमदार अहेर यांनी केले. पाण्यावरून आंदोलनकर्त्यांनी राजकारण करू नये, रामेश्वर धरणावरून कालवा बायपास करण्याची मागणी करून पूर्व व पश्चिम भागातील जनतेत संघर्ष निर्माण करू नये, असेही ते म्हणाले. गिरणा नदीपात्रातील अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी महसूल यंत्रणा, पोलीस व स्थानिक नागरिकांची समिती स्थापन करावी. नदीला पाणी नसेल तर त्यावेळी नदीपात्रात २४ तास बंदोबंस्त ठेवून वाळू चोरी पूर्णपणे थांबविण्याची सूचना आमदार अहेर यांनी संबंधित विभागाला दिल्या. वाखारी येथे अंगणवाडीसेविका भरती प्रक्रियेत एका महिलेवर अन्याय झाल्याने सदर भरती रद्द करून नवीन भरती करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिला. (वार्ताहर) महाराजस्व अभियान व विस्तारित समाधान योजना कार्यक्रमांतर्गत आमदार अहेर यांनी देवळा तहसील कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन केले होते.