शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरीत टॅँकरचे प्रस्ताव धूळ खात पडून

By admin | Updated: May 22, 2017 01:31 IST

तालुक्यातील काही वाड्यांचे टॅँकरचे प्रस्ताव इगतपुरीच्या पंचायत समितीत धूळ खात पडून असल्याचे चित्र दिसत आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कबेलगाव कुऱ्हे : महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून इगतपुरीची ओळख आहे. तालुक्यातील १२९ महसुली गावांपैकी पूर्व भागातील अनेक गावांना पाण्याची टंचाई कायम भेडसावत आहे. आजही काही आदिवासी वाड्यांना दूषित आणि गढूळ पाणी पिण्याची वेळ आली आहे, तर काही वाड्यांचे टॅँकरचे प्रस्ताव इगतपुरीच्या पंचायत समितीत धूळ खात पडून असल्याचे चित्र दिसत आहे. अनेक ठिकाणी हातपंपावरून पिण्याचे पाणी आणले जाते. ग्रामीण भागातील महिला दुष्काळी परिस्थितीला मात्र खूप वैतागल्या आहेत. या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी अनेक व्यक्ती खा३गी पाण्याचे टँकर मागवितात, तर काही शेतकरी आपली शेती वाचविण्यासाठी या खासगी टँकरचा उपयोग करीत असतात. त्यामुळे त्यांच्या पिकांना जीवदान मिळत असल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले. खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा होतो परंतु तो ग्राहकांना परवडणारा नसूनदेखील अनेक जण टँकरलाच पसंती देत आहेत. तालुक्यात दोन महिन्याच्या कालावधीत अंदाजे चारशेच्या आसपास विवाह संपन्न झाले. त्यामध्ये अंदाजे ग्राहकाला एक दिवसाला पिण्याचे पाणी १८०० रुपये टॅँकरप्रमाणे लागतात, तर एका दिवशी अनेक ग्राहकांना लाखो रुपये मोजावे लागतात. लग्नसराई असल्याकारणाने या सोहळ्यासाठी अनेक जण पिण्याच्या पाण्यासाठी खासगी टँकर मागवितात. साधारण या टॅँकरसाठी ग्राहकांना सुमारे दोन हजार रुपये टॅँकरधारकांना द्यावे लागतात. तालुक्यातील पाण्याची परिस्थिती पाहता टँकरधारकांना दुष्काळ आता हवाहवासा वाटू लागला आहे. इगतपुरी तालुक्यात खासगी टँकर २५० ते ३०० च्या आसपास असून, या परिस्थितीत त्यांची चांदी होत आहे. अनेक पाण्याच्या टॅँकरवर मोबाइल नंबर लिहिलेले असून, ग्राहक पाणी मिळावे यासाठी सदर मोबाइलवर फोन करताना दिसतात. बऱ्याच गावांमध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने खासगी टँकरधारकांना पाचारण केले जाते. साधारण एका टॅँकरची क्षमता १० हजार लिटर एवढी असते .