शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मनपा शाळांमध्ये ‘ग्रीन जीम’चा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2016 00:20 IST

शिक्षण सभापती : पहिल्याच दिवशी गणवेश

नाशिक : महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडेही जातीने लक्ष पुरविण्यासाठी मैदान असलेल्या ठिकाणी ग्रीन जीम बसविण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत आल्याची माहिती शिक्षण समितीचे सभापती संजय चव्हाण यांनी दिली. दरम्यान, शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना गणवेश आणि पुस्तकांचे वाटप करण्यात येणार असल्याचेही चव्हाण यांनी जाहीर केले आहे.शिक्षण समितीचे सभापती संजय चव्हाण यांनी सांगितले, शासन निर्णयानुसार येत्या १५ जून पासून मनपा शाळा सुरू करण्यात येणार आहे. त्यापूर्वी दि. १० ते १५ जून या कालावधीत प्रवेशोत्सव साजरा केला जाणार आहे. मनपा शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असून, नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले जाणार आहे. मनपा शाळांमध्ये गोरगरीब, मध्यमवर्गीयांच्या पाल्यांचा समावेश आहे. मुला-मुलींच्या आरोग्याच्यादृष्टीने ज्या शाळांमध्ये मैदान, क्रीडांगण आहे तेथे ग्रीन जीम बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी संबंधित शाळांकडून माहिती मागविण्यात आली असून तसा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. यंदा शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व संवर्गातील विद्यार्थ्यांना गणवेश आणि पाठ्यपुस्तकांचे वाटप केले जाणार आहे. खुल्या आणि ओबीसी संवर्गातील सुमारे साडेआठ हजार विद्यार्थ्यांनाही गणवेश देण्याच्या निर्णयाला स्थायी समितीने नुकतीच मंजुरी दिली असून, गणवेश वाटपाबाबतचेही नियोजन करण्यात येत आहे. यावर्षापासून मनपा शाळांमधील पटसंख्या वाढविण्यासाठी सेमी इंग्रजी अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असून, नुकत्याच झालेल्या आॅनलाइन बदल्यांमध्ये प्रत्येक शाळेत गणित, विज्ञान आणि इंग्रजी विषयासाठी शिक्षक देण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले. (प्रतिनिधी)