शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

वस्तीचे नाव बदलण्यासाठी पाच तालुक्यांचे प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:11 IST

नाशिक : वाड्या, वस्त्यांच्या नावातून जातिवाचक शब्द काढून टाकण्याचे राज्य शासनाचे आदेश असल्याने समाजकल्याण विभागाने आता याबाबतच्या हालचाली गतिमान ...

नाशिक : वाड्या, वस्त्यांच्या नावातून जातिवाचक शब्द काढून टाकण्याचे राज्य शासनाचे आदेश असल्याने समाजकल्याण विभागाने आता याबाबतच्या हालचाली गतिमान केल्या आहेत. समाजकल्याण आयुक्तांनी याप्रकरणी राज्याचा आढावा घेतला असता नाशिक जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधून वस्त्यांची नावे बदलण्यासाठीचे प्रस्ताव प्राप्त झाल्याचे समाजकल्याण विभागाकडून जाहीर करण्यात आले.

डिसेंबर २०२०मध्ये राज्य शासनाने वाड्या वस्त्यांच्या नावातून जातिवाचक शब्द रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार संबंधितांनी समाजकल्याण विभागाकडे प्रस्ताव सादर करावेत, असे जाहीर करण्यात आले होते. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्यामुळे समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी नुकताच आढावा घेतला. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या विषयावर पुढील पंधरा दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. यामुळे राज्यभरातील वाड्या, वस्त्यांच्या नावातून जात हद्दपार करण्याच्या विषयाला गती मिळणार आहे.

ज्या वाड्या, वस्त्यांच्या नावाने जात प्रतित होते, अशी नावे बदलून समतानगर, क्रांतिनगर, भीमनगर, ज्योतीनगर, शाहूनगर असे नामकरण करण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे. समाजकल्याण आयुक्त डॉ. नारनवरे यांच्या निर्देशानुसार नाशिक प्रादेशिक उपायुक्तांनी नाशिक विभागातील सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांची दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून १५ जून रोजी बैठक घेतली. नाशिक जिल्ह्यात २७७ वस्त्या असून, नाव बदलण्यासाठी पाच तालुक्यांमधून प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. उर्वरित सहा तालुक्यांतून प्रस्ताव लवकरच प्राप्त होणार आहेत. तीन तालुक्यातील वस्त्यांची नावे बदलण्याची आवश्यकता नसल्याची माहिती जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाने दिली आहे.

दरम्यान, नारनवरे यांनी दिनांक १६ रोजी राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांना या विषयावर विनंती करणारे पत्र लिहिले होते. त्यानुसार विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे पाचही जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यांची बैठक घेत याबाबतची कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.