शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

निवृत्त अधीक्षक अभियंत्याच्या विभागीय चौकशीचा प्रस्ताव

By admin | Updated: June 2, 2016 23:02 IST

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प : आर. के. पवार यांच्यावर ठपका; कारवाई होण्याची शक्यता

 नाशिक : महापालिकेने केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुथ्थान अभियानांतर्गत पाथर्डी फाटा येथे सुमारे ६० कोटी रुपये खर्चून उभारलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या कामात मोठ्या प्रमाणावर अनियमितता आणि गंभीर स्वरूपाच्या त्रुटी चौकशीत निदर्शनास आल्याने तत्कालीन अधीक्षक अभियंता (यांत्रिकी) आणि चार महिन्यांपूर्वीच निवृत्त झालेले आर. के. पवार यांच्यावर ठपका ठेवण्यात आला असून, त्यांच्या विभागीय चौकशीचा प्रस्ताव आयुक्तांनी येत्या महासभेवर ठेवला आहे. चौकशी अहवालातील एकूणच आक्षेप पाहता आर. के. पवार यांच्याविरुद्ध कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास केंद्र शासनाने मान्यता दिल्यानंतर महापालिकेतील यांत्रिकी विभागाने विविध प्रकल्प राबविले होते. मात्र, हा प्रकल्प अजूनही पूर्ण क्षमतेने चालविला गेलेला नाही. या प्रकल्पात खरेदी करण्यात आलेल्या मशिनरींबाबत महासभेत वारंवार सदस्यांकडून प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यानुसार, आयुक्तांनी १५ डिसेंबर २०१५ रोजी चौकशी समिती नेमली होती. या समितीचा अहवाल २८ जानेवारी २०१६ रोजी आयुक्तांना सादर करण्यात आला. सदर चौकशी अहवालात तत्कालीन अधीक्षक अभियंता (यांत्रिकी) आर. के. पवार यांच्याविरुद्ध अनेक आक्षेप नोंदवत ठपका ठेवण्यात आला आहे. त्यात प्रामुख्याने, सदर प्रकल्पाचा अहवाल करताना त्यात विद्युतीकरण व विद्युतभाराच्या जोडणीचे काम डीपीआरमध्ये समाविष्ट न केल्याने प्रकल्प वेळेवर होऊ शकला नाही. सदर डीपीआरला शासन व महासभेची मान्यता घेण्यात आली नसल्याने सर्व खर्च मनपा निधीतून करावा लागला. त्यामुळे मनपाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. प्रकल्प वेळेत सुरू करणे व तो निरंतर सुरू राहण्याबाबत योग्य नियोजन केलेले नाही. कंपोष्ट निर्मिती, विद्युत निर्मिती हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविले नाहीत. प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर किमती मशिनरी खरेदी करण्यात आल्या; परंतु प्रत्यक्षात त्या सुरूच झाल्या नाहीत. काही मशिनरी विनावापर पडून राहिल्याने मनपाचे आर्थिक नुकसान झाले. प्रकल्पाचे योग्य व्यवस्थापन न केल्यामुळे सदर प्रकल्पाचा फायदा जनतेला झाला नसल्याचा ठपका पवार यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आयुक्तांनी चार महिन्यांपूर्वीच निवृत्त झालेल्या आर. के. पवार यांच्याविरुद्ध आता विभागीय चौकशी सुरू करण्याचा प्रस्ताव येत्या महासभेवर मान्यतेसाठी ठेवला आहे. विभागीय चौकशीत पवार दोषी आढळून आल्यास त्यांच्या निवृत्ती वेतनातून कोट्यवधींची आर्थिक नुकसानीची वसुली केली जाण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)