शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाल किल्ल्यापासून काश्मीरच्या जंगलांपर्यंत भारताला मारले'; पाकिस्तानी नेत्याची विधानसभेत जाहीर कबुली
2
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
3
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
4
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
5
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
6
नितीश कुमार 10व्यांदा होणार बिहारचे मुख्यमंत्री; NDA च्या बैठकीत शिक्कामोर्तब, उद्या शपथविधी
7
Viral Video : प्रवेशद्वारावरील मेटल डिटेक्टरला घंटा समजू लागले लोक; एकाने हात लावल्यावर पुढे काय झाले बघाच!
8
फोडाफोडीचं कारण, पक्षामध्ये खदखद! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत, अमित शाहांची घेणार भेट
9
स्पेशल 26! बंगळुरूमध्ये भरदिवसा लूट; छाप्याच्या नावाखाली तब्बल ७.११ कोटींवर मारला डल्ला
10
शिंदे शिवसेना की भाजपने घातला पहिला घाव? परस्परांचे माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा
11
“महायुतीत एकनाथ शिंदे एकटे पडले, लाचारी पत्करण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा”: काँग्रेस
12
'धुरंधर' चित्रपटाचा ट्रेलर पाहून ध्रुव राठी संतापला; थेट ISIS शी केली तुलना, म्हणाला...
13
'ऑपरेशन सिंदूर'ने पाकिस्तानला दिलाय मोठा दणका; ६ महिन्यांनंतरही 'नूर खान एअरबेस' पूर्ववत होईना!
14
पाकिस्तानमुळे मोठे आर्थिक नुकसान, आम्हाला चीन..; एअर इंडियाची केंद्र सरकारकडे 'ही' मागणी
15
'मिसेस देशपांडे'मध्ये दिसणार माधुरी दीक्षित, केली नव्या सीरिजची घोषणा; सोबत मराठी अभिनेता
16
सूडाची भावना! पत्नीचे पुतण्याशी संबंध; पतीला समजताच झाडल्या गोळ्या, स्वत:लाही संपवलं
17
काय आहे ही 'टीना', नफा घटला तरीही एलजीचे शेअर्स ४ टक्क्यांनी वाढले; ब्रोकर्सनी दिले मोठे टार्गेट...
18
जैश-ए-मोहम्मदची परिस्थिती बिघडली, दहशतवाद्यांना थंडीपासून वाचवण्यासाठी पैसे मागण्याची आली वेळ
19
काँग्रेस नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट; बैठकीत काय ठरले? सुप्रिया सुळेंनी दिली मोठी अपडेट
20
₹३८ च्या शेअरची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला ५८८४% परतावा! काय आहे कंपनीचा व्यवसाय?
Daily Top 2Weekly Top 5

पेलिकन पार्कच्या जागेवर ‘सेंट्रल पार्क’चा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 14:45 IST

नाशिक : सिडकोतील बहुचर्चित पेलिकन पार्कच्या जागेबाबत न्यायालयाकडून कोणत्याही प्रकारचे आदेश नसल्याने पार्कची जागा विकसित करण्याचा महापालिकेचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे महापालिकेने पेलिकन पार्कच्या जागेवर ‘सेंट्रल पार्क ’ उभारण्याचा प्रस्ताव तयार केला असून, त्यासाठी सुमारे १५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. महापालिकेने त्याकरिता शासनाकडे निधी मिळविण्यासाठी आमदार सीमा हिरे ...

ठळक मुद्देनिधीची मागणीसुमारे १५ कोटी खर्च अपेक्षित

नाशिक : सिडकोतील बहुचर्चित पेलिकन पार्कच्या जागेबाबत न्यायालयाकडून कोणत्याही प्रकारचे आदेश नसल्याने पार्कची जागा विकसित करण्याचा महापालिकेचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे महापालिकेने पेलिकन पार्कच्या जागेवर ‘सेंट्रल पार्क ’ उभारण्याचा प्रस्ताव तयार केला असून, त्यासाठी सुमारे १५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. महापालिकेने त्याकरिता शासनाकडे निधी मिळविण्यासाठी आमदार सीमा हिरे यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू केला आहे.पेलिकन पार्कचे ठेकेदार पूना अ‍ॅम्युझमेंटने महापालिकेविरुद्ध जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला होता. परंतु, सदर निकाल महापालिकेच्या बाजूने लागला. त्यानंतर ठेकेदाराने पुन्हा वरिष्ठ न्यायालयात अपील दाखल केले परंतु, तेथेही मनपाच्याच बाजूने कौल मिळाला. ठेकेदाराने उच्च न्यायालयात धाव घेतली परंतु, न्यायालयाने अपील दाखल करून घेताना कुठलाही आदेश दिलेला नाही. त्यामुळे पेलिकन पार्कची जागा महापालिका विकसित करू शकते. त्यावर सलीम शेख यांनी सदर जागेत नागरिकांना सोयी-सुविधा पुरविणारा प्रकल्प उभारण्याची सूचना केली. दरम्यान, पेलिकन पार्कच्या जागेचा तिढा सुटल्याने महापालिकेच्या बांधकाम विभागाने त्याठिकाणी ‘सेंट्रल पार्क’ उभारण्याचा प्रस्ताव तयार केला असून, त्याठिकाणी मूलभूत सोयी-सुविधा मिळाव्यात याकरिता शासनाकडे निधीची मागणी केलेली आहे. तसा प्रस्ताव नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे यांनी शासनाकडे दिलेला असून, निधीसाठी पाठपुरावा सुरू आहे. सदर पार्कसाठी सुमारे १५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.