शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

‘एसपीव्ही’वगळूनचप्रशासनाला ठराव रवाना

By admin | Updated: December 11, 2015 23:55 IST

स्मार्ट सिटी प्रस्ताव : प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष

नाशिक : केंद्र सरकारची स्मार्ट सिटी योजना फसवी असल्याचे सांगत नाशिकचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश होऊ देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी घेतल्यावर महापौरांनी महासभेच्या निर्णयात कोणताही बदल न करता ‘करवाढ’ आणि ‘एसपीव्ही’ (स्पेशल पर्पज व्हेइकल) वगळून प्रस्ताव प्रशासनाला रवाना केला आहे. ‘एसपीव्ही’वगळून प्रस्ताव प्रशासनाला पाठविण्यात आल्याने दुसऱ्या टप्प्यातील चॅलेंज स्पर्धेत नाशिकचा टिकाव लागण्याची शक्यता मावळली आहे. दि. १५ डिसेंबरपर्यंत प्रस्ताव राज्य शासनाला सादर करावयाचा असल्याने आता प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.दि. २ डिसेंबर रोजी विशेष महासभेत स्मार्ट सिटीच्या प्रस्तावातील करवाढ आणि ‘एसपीव्ही’ला सदस्यांनी कडाडून विरोध दर्शविला होता. भाजपाच्या सदस्यांनी केवळ करवाढीला विरोध दर्शवित ‘एसपीव्ही’बद्दल भूमिका स्पष्ट केलेली नव्हती. त्यामुळे सभागृहात पुन्हा एकदा भाजपा एकाकी पडली होती. उपमहापौर गुरुमित बग्गा यांनी एसपीव्ही अर्थात कंपनीकरणामुळे महापालिकेच्या स्वायत्ततेवरच घाला येणार असल्याची भीती व्यक्त करत त्याला विरोध दर्शविला होता. त्यानंतर सभागृहानेही बग्गा यांच्या सुरात सूर मिसळून कंपनीकरणाचा प्रस्ताव झुगारून लावला. एसपीव्ही हाच स्मार्ट सिटीचा मूळ गाभा असताना तोच वगळण्यात आल्याने स्मार्ट सिटी अभियानात नाशिकच्या सहभागाची शक्यता धूसर बनली. आयुक्तांनीही एसपीव्हीशिवाय प्रस्तावाला काहीच अर्थ नसल्याचे सांगत एसपीव्हीचा समावेश नसेल तर नाशिकच्या समावेशाबाबत शंका उपस्थित केली होती.