शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
4
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
5
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
6
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
7
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
8
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
9
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
10
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
11
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
12
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
13
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
14
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
15
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
16
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
17
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
18
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
19
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
20
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?

६४ गावांचे टँकरसाठी प्रस्ताव

By admin | Updated: July 12, 2014 00:28 IST

६४ गावांचे टँकरसाठी प्रस्ताव

बागलाण : तालुक्यातील पर्जन्यमान पूर्णत: घसरल्याने शेतीसिंंचनासह पिण्याच्या पाण्याची भीषणता जाणवू लागली आहे. तालुक्यात सद्यस्थितीत २८ गावे व १ वाडीला टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, पावसाने अजून अवकृपा केल्यास सुमारे ६४ गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी नाशिक यांच्याकडे मंजुरीसाठी रवाना करण्यात येणार आहे.बागलाण तालुक्यातील १७१ महसुली गावांपैकी सुमारे १२९ ग्रामपंचायतींमधील शेतीसिंंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसागणिक बिकट होत आहे. पावसाने अवकृपा केल्याने सर्वत्र चिंंतेचे वातावरण आहे. शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्यासाठी मोठी भीषणता जाणवू लागली आहे. तालुक्यातील हरणबारी व केळझर धरणातील जलसाठा निरंक झालेला आहे. गतवर्षी जून १३ अखेर तालुक्यात सुमारे १८९.८ इतका पाऊस झालेला होता. तुलनेने जून १४ अखेर अवघा ८.९ मि.मी. इतका पाऊस झालेला आहे. यामुळे प्रशासना-बरोबरच सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांची चिंंता वाढली आहे.तालुक्यात आजमितीस २८ गावे व १ वाडीस २० टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यात पाच शासकीय, तर १५ खासगी टँकरचा समावेश आहे, तर तालुक्यातील १४ विहिरी अधिग्रहीत करण्यात आलेल्या असून, सहा विहिरींवरून टँकर भरण्यात येतात, तर आठ विहिरींवरून गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. टँकर सुरू असलेल्या २८ गावांमध्ये वरचे टेंभे, इजमाने, खिरमाणी, खालचे टेंभे, कूपखेडा, वायगाव, महड, बहिराणे, पिंंपळदर, डोंगरेज, चिराई, राहुड, रातीर, रामतीर, चौगाव, तरसाळी, इंदिरानगर, सारदे, श्रीपूरवडे, मोरेनगर, सुराणे, खमताणे, अजमिर सौंदाणे, पिंंपळकोठे, कातरवेल, नवेगाव, बिलपुरी, आखतवाडे यांचा समावेश आहे तर वघाणेपाडे या वाडीचा समावेश आहे.विद्यमान परिस्थिती जैसे थे काही दिवस राहिल्यास दुसऱ्या टप्प्यात तालुक्यातील दऱ्हाणे, पिंंपळदर, मोरेनगर, रातीर, केरोबानगर, कोदमाळ, चापापाडा, मानूर, जायखेडा, गोळवाड, नवी शेमळी, विंंचुरे, जोरण, आव्हाटी, बुंधाटे, ब्राह्मणगाव, साल्हेर, अंबापूर, कंधाणे, कोळीपाडा, अजमिर सौंदाणे, कातरवेल, तळवाडे दिगर, जुने नवे निरपूर, वटार, औंदाणे, मोरकुरे, मुंजवाड, पारनेर, मुळाणे या गावांचा तर भाक्षीअंतर्गत रामनगर, फुलेनगर, शरदनगर, सागर कॉलनी, वनोली अंतर्गत भंडारपाडा, सुराणेअंतर्गत लोणारवाडी मानूरअंतर्गत बिरदावनपाडा, खैराडपाडा, साल्हेर अंतर्गत महारदर, भाटअंबा, मोहळांगी, कोळीपाडा, अमरावती, ठेंगोेडांतर्गत लांगडेबेट यांचा वाड्यांचा समावेश आहे, तर सटाणा शहरात चार ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्याबाबत प्रशासन विचाराधीन असून, शहरातील जनतेलादेखील पाणीकपातीला सामोरे जाण्याचा प्रसंग उद्भवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)