शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींच्या मालमत्तेची ड्रोनद्वारे होणार मोजणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 01:18 IST

ग्रामपंचायतीच्या मालकिच्या मालमत्तेपासून ते थेट गावातील प्रत्येक नागरिकाच्या नावे असलेल्या जमिनीची ड्रोनच्या साहाय्याने मोजणी करून, त्याची मालमत्ता नावे करण्याच्या केंद्र सरकारच्या सन्मान योजनेसाठी जिल्ह्यातील दोन तालुक्यांची पायलट प्रोजेक्टसाठी निवड करण्यात आली आहे. 

ठळक मुद्देदेवळा, इगतपुरीत पायलट प्रोजेक्ट : मालमत्ता पत्र देणार

नाशिक : ग्रामपंचायतीच्या मालकिच्या मालमत्तेपासून ते थेट गावातील प्रत्येक नागरिकाच्या नावे असलेल्या जमिनीची ड्रोनच्या साहाय्याने मोजणी करून, त्याची मालमत्ता नावे करण्याच्या केंद्र सरकारच्या सन्मान योजनेसाठी जिल्ह्यातील दोन तालुक्यांची पायलट प्रोजेक्टसाठी निवड करण्यात आली आहे. देवळा आणि इगतपुरी तालुक्यात ड्रोनद्वारे मोजणीला सुरुवात केल्यानंतर, जिल्ह्यातील प्रत्येक गावात अशा प्रकारची मोजणी करण्यात येणार आहे.   जमाबंदी आयुक्तांकडून या उपक्रमांची सुरुवात करण्यात आली होती. तथापि, त्यासाठी येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेता, या उपक्रमाला खीळ बसली. मात्र, राज्य सरकारच्या या उपक्रमाची दखल घेण्यात येऊन त्यांनी देशपातळीवर ते राबविण्याचा निर्णय घेतला. जिल्हा, तालुका, गाव पातळीवर प्रत्येक जमिनीची मोजणी आता केली जाणार असून, या जमिनीची मालकी त्या-त्या व्यक्ती, संस्थेच्या नावे केले जाणार आहे. ग्रामपंचायतीच्या हद्दीतील प्रत्येक गावाची मोजणी केली जाणार आहे. त्यासाठी गाव नकाशा, गावठाणातील जागा, ग्रामपंचायतीच्या मालकिची हद्द व मालकी निश्चित केली जाईल. गाव मोजणी झाल्यानंतर व्यक्ती, संस्थांच्या नावे मालमत्ता पत्र दिले जाणार आहे. देवळा व इगतपुरीतील निवडणुका असलेल्या ग्रामपंचायती वगळता अन्य गावांमध्ये ही मोजणी केली जाईल. निवडणुकीनंतर १९ जानेवारीपासून दोन्ही तालुक्यांची मोजणी होईल. नाशिक जिल्ह्यातील देवळा, इगतपुरी, नाशिक व सिन्नर या चार तालुक्यांची त्यासाठी निवड करण्यात आली असली, तरी प्रायोगिक पातळीवर देवळा व इगतपुरी या दोन तालुक्यांत याची सुरुवात केली जाणार आहे. उत्तराखंडच्या देहरादून येथील एका संस्थेच्या मदतीने हे काम केले जाणार आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयGovernmentसरकार