शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

प्रॉपर्टी डीलरची गोळी झाडून हत्त्या

By admin | Updated: February 17, 2016 23:38 IST

जैन भवनजवळील घटना : चौघे संशयित फरार; पूर्ववैमनस्यातून चिघळला वाद

नाशिकरोड : जयभवानी रोड येथील तरुण रणजित मकवाना याची मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास पूर्ववैमन्यस्यातून गोळी झाडून हत्त्या करण्यात आली. आर्टिलरी सेंटररोडवरील जैन भवन जवळ सदर घटना घडली. घटनेनंतर हल्लेखोर फरार झाले. याप्रकरणी मयत रणजितच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीनुसार जयभवानी रोड फर्नांडिसवाडी येथील देवरथ अपार्टमेंट येथे राहणारा रणजित जगशरण मकवाना (वय ३५) याचा प्रॉपर्टी खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. मंगळवारी रात्री पाउणच्या सुमारास रणजित घरी परतला असता फर्नांडिसवाडी येथे राहणारे रोहित ऊर्फ माले गोविंद डिंगम, मयूर चमन बेद, संजय ऊर्फ मॉडेल चमन बेद, विनोद राजाराम साळवे हे चौघे रणजित यांच्याशी इमारतीखालीच बोलत होते. त्यानंतर रणजित कपडे बदलून या चौघांसोबत जाण्यास निघाला असता त्याची पत्नी आणि आई यांनी त्यास या चौघांसोबत जाण्यास मज्जाव केला; मात्र रणजित हा आपली अ‍ॅक्टिव्हा दुचाकी घेऊन त्यांच्यासोबत गेला. संशयित चौघे आणि रणजित यांच्यात यापूर्वी वाद झालेला असल्याने रणजितची पत्नी गीता, आणि बहीण पूनम यांनी रस्त्याने जाणारी एक रिक्षा थांबवून लागलीच रणजित याच्या मागे त्या गेल्या असता आर्टिलरी सेंटररोड जैन भवन येथे रणजितला चौघे संशयित जुन्या भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ करून मारहाण करीत असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी रणजितला मारू नका असा आवाज दिला असता मयूर बेद, संजय ऊर्फ मॉडेल बेद, विनोद साळवे यांनी रणजितचे दोन्ही हात पकडून ठेवले तर रोहित ऊर्फ माले डिंगम याने गावठी कट्टा काढून रणजितच्या डोक्यात पाठीमागून गोळी झाडली. रणजित रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडताच चौघे संशयित पसार झाले. आर्टिलरी सेंटररोड येथे युवकावर गोळीबार करून त्याची हत्त्या करण्यात आल्याची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रणजितला त्वरित बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासून त्यास मयत घोषित केले. सदर घटनेचे वृत्त जयभवानी रोड व परिसरात समजताच नातेवाईक, युवकांनी बिटको रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. यामुळे परिसरात दहशत व तणावाचे वातावरण पसरले होते.