शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

फॉरेन्सिक लॅबरोटरीद्वारे न्यायालयात व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे साक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 20:43 IST

खून, बलात्कार यासारख्या क्लिष्ट गुन्ह्यांमध्ये वैज्ञानिक तपासणी व तपासणीस यांची भूमिका महत्त्वाची ठरते़ न्यायालयातील गुन्ह्यांसाठी साक्ष देण्यासाठी नाशिकच्या प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सुरू करण्यात आले

ठळक मुद्दे अचलपूर जिल्हा न्यायालय वेळ व पैसा दोहोंचीही बचत क्लिष्ट फौजदारी खटल्यांमध्ये फॉरेन्सिक लॅबोरेटरीचा तपासणी अहवाल

नाशिक : न्यायालयातील साक्ष म्हटली कि साक्षीदाराला सकाळी अकरा वाजता हजर रहावेच लागते़ न्यायालयात दिवसभरात खटल्याचा पुकारा जेव्हा होईल त्यावेळी साक्ष घेतली जाते, तर कधी कामाचा व्यापामुळे साक्ष न होता पुढील तारीखही दिली जाते़ त्यातच खून, बलात्कार यासारख्या क्लिष्ट गुन्ह्यांमध्ये वैज्ञानिक तपासणी व तपासणीस यांची भूमिका महत्त्वाची ठरते़ न्यायालयातील गुन्ह्यांसाठी साक्ष देण्यासाठी नाशिकच्या प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सुरू करण्यात आले असून याद्वारे अमरावती जिल्ह्यातील अचलपूर जिल्हा न्यायालयात प्रथम साक्ष घेण्यात आली आहे़ राज्यातील साक्ष घेण्याचा हा पहिलाच प्रयोग आहे़न्यायालयात सुरू असलेल्या क्लिष्ट फौजदारी खटल्यांमध्ये फॉरेन्सिक लॅबोरेटरीचा तपासणी अहवाल महत्वाचा पुरावा ठरतो़ वैज्ञानिक पुरावे गोळा करणारे कर्मचारी व तपासणीस यांच्यावरच गुन्हेगाराची शिक्षा अवलंबून असते़ यामुळे संबंधित व्यक्तीस न्यायालयात साक्षीसाठी हजर रहावे लागते़ मात्र यासाठी त्याला आपले काम सोडून वेळ व पैसा असे दोन्ही खर्च करावे लागतात़ नाशिकच्या प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेमध्ये व्हीडीओ कॉन्फरन्सिंगची व्यवस्था करण्यात आली असून सहायक रासायनिक विश्लेषक वैशाली महाजन यांनी २३ आॅगस्ट रोजी अमरावती जिल्ह्यातील अचलपूर जिल्हा न्यायालयात डीएनए चाचणीसंदर्भात आपली साक्ष नोंदविली़ याप्रकारे न्यायालयात साक्ष नोंदविण्याची संधी वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या इतिहासात प्रथमच नाशिकच्या प्रयोगशाळेला मिळाली आहे़न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत दाखल होणाºया प्रकरणांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे़ त्यातच शासकीय अधिकाºयांच्या बदल्या झाल्यानंतर बहुतांशी प्रकरणे सुनावणीसाठी येतात़ त्यामुळे या अधिकाºयांना आपली कामे सोडून साक्षीसाठी न्यायालयात हजर राहावे लागते यामध्ये त्यांचा वेळ व पैसा यांचा अपव्यय तर होतोच शिवाय कामावरही परिणाम होतो़ मात्र, आता या सुविधेचा न्यायालयांनी वापर केल्यास या अधिकाºयांचा वेळही वाचणार आहे़ व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचा हा पर्याय नाशिक विभागातील न्यायालयांमध्ये राबविता येणेही शक्य आहे़