शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
2
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
3
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
4
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
5
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
6
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
7
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
8
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
9
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
10
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
11
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
12
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
13
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
14
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
15
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
16
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
17
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
18
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
19
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
20
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले

पदोन्नती मिळूनही नायब तहसीलदारांपुढे प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 18:59 IST

गेल्या दोन वर्षांपासून विभागीय पातळीवरील पदोन्नती समितीला अव्वल कारकून, मंडळ अधिकाऱ्यांच्या नायब तहसीलदार पदावर पदोन्नती देण्याबाबत बैठक घेण्यास अवधी मिळाला नसल्याने विभागात जवळपास १०४ नायब तहसीलदार सेवानिवृत्तीने निवृत्त झाले. अर्थात या सेवानिवृत्त नायब तहसीलदारांना

ठळक मुद्देवर्षभरात होणार ३७ पदे रिक्त : आचारसंहितेचे गडद सावट

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : दोन वर्षांपासून रखडलेला अव्वल कारकून ते नायब तहसीलदार पदोन्नतीचा प्रश्न चुटकीसरशी सोडवल्याचा दावा करून पदोन्नत नायब तहसीलदारांना नवीन नेमणुका देण्यात आल्या असल्या तरी, विभागीय पदोन्नती समितीने रिक्त असलेल्या १०४ जागांंपैकी जेमतेम ५९ जागा पदोन्नतीने भरल्या असून, चालू वर्षी आणखी ३७ नायब तहसीलदारांची पदे सेवानिवृत्तीने रिक्त होणार आहेत. चालू वर्ष निवडणुकीचे असल्यामुळे सप्टेंबर महिन्यात समितीला आचारसंहितेमुळे पदोन्नती देण्यात अडचणी निर्माण होईल, परिणामी रिक्त पदांच्या अतिरिक्त भाराचे ओझे नायब तहसीलदारांवर कायम राहण्याची चिन्हे आहेत.

गेल्या दोन वर्षांपासून विभागीय पातळीवरील पदोन्नती समितीला अव्वल कारकून, मंडळ अधिकाऱ्यांच्या नायब तहसीलदार पदावर पदोन्नती देण्याबाबत बैठक घेण्यास अवधी मिळाला नसल्याने विभागात जवळपास १०४ नायब तहसीलदार सेवानिवृत्तीने निवृत्त झाले. अर्थात या सेवानिवृत्त नायब तहसीलदारांना पुढे तहसीलदारपदाची पदोन्नती न मिळाल्याने त्यांची अपेक्षा पूर्ण होऊ शकली नाही. मात्र नायब तहसीलदाराच्या पदोन्नतीचे स्वप्न पाहणा-या विभागातील ५९ जणांना जानेवारी महिन्यात न्याय मिळाला. मुळात दरवर्षी सप्टेंबर महिन्यात विभागीय पदोन्नती समितीची बैठक अपेक्षित असते. या बैठकीत पुढच्या वर्षी डिसेंबरअखेर सेवानिवृत्त होणाºया नायब तहसीलदारांची संख्या विचारात घेऊनच आगावू पदोन्नतीचे सिलेक्शन करणे क्रमप्राप्त असते. जशी पदे रिक्त होतील त्या त्या प्रमाणात नायब तहसीलदारांची पदे भरली जावीत, असे संकेत असतात. परंतु जानेवारी महिन्यात विभागीय पदोन्नती समितीच्या बैठकीत सन २०१९ अखेर रिक्त होत असताना त्याचा कोणताच विचार केला गेला नाही. समितीने ५९ जणांना नायब तहसीलदारपदी पदोन्नती देत गेल्या आठवड्यात त्यांना ‘सोयी’ने नेमणुका दिल्या असल्या तरी, यंदा जवळपास ३७ पदे सेवानिवृत्तीने रिक्त होणार आहेत. या पदांचा समितीने विचार केलेला नाही. सप्टेंबर महिन्यात राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम व आचारसंहिता लागू असेल. अशा परिस्थितीत कर्मचाºयांच्या पदोन्नतीची बैठक घेणे बेकायदेशीर ठरणार आहे. आॅक्टोबर, नोव्हेंबरपर्यंत नवीन सरकारचा कारभार सुरू झालेला असेल अशा परिस्थितीत ३७ पदांंवर नायब तहसीलदार होऊ इच्छिणा-यांचे स्वप्न भंगच तर होईलच, परंतु त्यांच्या पदोन्नतीचा अधिकारही हिरावून घेतला जाऊन आर्थिक नुकसानही सोसावे लागणार आहे.

टॅग्स :Governmentसरकारnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय