शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

प्रचाराच्या तोफा आज थंडावणार

By admin | Updated: February 19, 2017 01:50 IST

मंगळवारी होणार मतदान

नाशिक : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी रविवारी (दि.१९) प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. येत्या मंगळवारी (दि. २१) सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होणार असून, गुरुवारी, दि. २३ रोजी तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठीच्या प्रचाराची मुदत १९ फेब्रुवारी रोजी संपणार आहे. सायंकाळी ५ वाजता प्रचार तोफा थंडावणार असून, त्यानंतर दोन दिवस वैयक्तिक प्रचार व गुप्त भेटीगाठी सुरू होतील. मतदान केंद्रांवर कामकाज करण्यासाठी जवळपास १७ हजार २०० अधिकारी व कर्मचारी तसेच साडेआठशे वाहने अधिग्रहीत करण्यात आली आहेत. मंगळवारी मतदान होणार असून, त्यानंतर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी २३ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल. गुरुवारी दुपारपर्यंत सर्व ७३ गट व १४६ गणांचे निकाल जाहीर होण्याचा अंदाज सूत्रांनी वर्तविला आहे. (प्रतिनिधी)२५३ केंद्रे संवेदनशीलजिल्ह्यात एकूण २६५३ मतदान केंद्रांवर मंगळवारी मतदान होणार आहे. या २६५३ पैकी जिल्ह्णात जवळपास २५३ मतदान केंद्रे संवेदनशील असून, त्यातील १५ मतदान केंद्रे अतिसंवेदनशील ठरविण्यात आली आहेत. या २५३ संवेदनशील केंद्रांवर व १५ अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाने एकत्र तपासणी करीत संवेदनशील व अतिसंवेदनशील केंद्रांची निवड केली आहे.