शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

लोककला चळवळीला प्रोत्साहन मिळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 00:44 IST

‘ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून कष्टकºयांच्या हातावर तरलेली आहे,’ असे संपूर्ण जगाला ठणकावून सांगणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे नाशिक शहरात भव्य स्मारक उभारून तेथे त्यांच्या ग्रंथसंपदेचे दालन करावे, तद्वतच शाहिरीसह लोककला चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी या स्मारकात सभागृह असावे, विविध उपक्रम राबवावेत, असे मत चळवळीतील कार्यकर्ते व कला अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.

नाशिक : ‘ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून कष्टकºयांच्या हातावर तरलेली आहे,’ असे संपूर्ण जगाला ठणकावून सांगणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे नाशिक शहरात भव्य स्मारक उभारून तेथे त्यांच्या ग्रंथसंपदेचे दालन करावे, तद्वतच शाहिरीसह लोककला चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी या स्मारकात सभागृह असावे, विविध उपक्रम राबवावेत, असे मत चळवळीतील कार्यकर्ते व कला अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. साहित्य, कला, राजकारण आणि समाजसुधारणा अशा चौफेर क्षेत्रात आपला ठसा उमटविणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी साहित्य क्षेत्रात मुशाफिरी करत वेगवेगळ्या विषयांवर सुमारे पाऊणशे पुस्तके लिहिली. इतकेच नव्हे तर डाव्या विचारसरणीच्या कामगार चळवळीत मोठे योगदान दिले आहे. साहजिकच कंपनी कामगार, रस्त्यावरचा श्रमिक, बांधकाम मजूर, शेतमजूर या सर्वांसाठी अण्णा भाऊ साठे हे प्रेरणास्थान असल्याने त्यांचे नाशिक शहरात उचित स्मारक उभारावे, तसेच या स्मारकात लोकवाङ्मयांच्या अभ्यासासाठी भव्य दालन उभारावे, अशी आग्रही मागणी अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांचे पाईक असलेल्या कार्यकर्त्यांनी केली आहे. अण्णा भाऊ साठे स्मृती मंडळाचे अध्यक्ष दशरथ मानवतकर यांनी सांगितले की, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची ओळख नव्या पिढीला व्हावी तसेच त्यांचे विचार व कार्य पोहचविण्यासाठी प्रत्येक शहरातील श्रम वसाहतीत आणि उद्योग वसाहतीत स्मारक उभारावे, अशी मागणी होत आहे. लोककला संघटनेचे जिल्हा प्रवक्ते संजय पंचरस म्हणाले की, पुणेनजीक बिबडेवाडी येथे अण्णा भाऊ साठे यांचे भव्य स्मारक उभे आहे, त्यासारखे स्मारक नाशिक, मालेगाव यांसह अन्य शहरांत देखील व्हावे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भरत जाधव आणि मातंग समाज समन्वय समितीचे अध्यक्ष विश्वास कांबळे, अण्णा भाऊ साठे समाज सेवा फाउंडेशनचे दिनकर लांडगे, मातंग संघर्ष समितीचे संस्थापक अशोक साठे आदींसह अनेक संघटनांच्या पदाधिकाºयांनी अण्णा भाऊ साठे स्मारकाचा प्रश्न शासनाने लवकरात लवकर मार्गी लावावा, अशी मागणी केली आहे.भारतरत्न पुरस्कारासाठी विविध संघटनांचे आवाहनलोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळातदेखील समाजातील वंचित, शोषित घटकांसाठी सतत कार्य केले आहे. सर्वच मागासवर्गाचा विकास व्हावा म्हणून त्यांचे योगदान राहिले. याची दखल घेऊन त्यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र मातंग संघर्ष समिती, मातंग समाज संघटना, बहुजन रयत परिषद, अण्णा भाऊ साठे जागृती संघ, अण्णा भाऊ साठे फाउंडेशन, लहुशक्ती संग्राम परिषद, साठे समाजसेवा फाउंडेशन आदींसह १४ संघटनांनी केली आहे.