सिन्नर : शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर भारतीय संस्कृतीचे जतन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प.पू. गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांनी केले.भगूर येथे नाशिक जिल्हा शिवसेनेच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यावेळी गुरुमाउली मोरे बोलत होते. शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज कला दालनात झालेल्या कार्यक्रमात मोरे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.संस्कारातूनच राम, अर्जुन यासारखी माणसं उभी राहिली म्हणून गुरु चे स्थान महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. विद्यार्थ्यांना पाच गुरु असल्याचे त्यांनी सांगितले. पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या वतीने एस. बी. देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी आमदार योगेश घोलप, सरपंच युवराज गोडसे, नगराध्यक्ष अनिता करंजकर, उपाध्यक्ष प्रतिभा घुमरे, जयश्री देशमुख, संग्राम करंजकर, रवींद्र मालुंजकर, राजेश गडाख उपस्थित होते. आई, वडील, पहिली ते चौथीचे शिक्षक, पाचवी ते दहावीचे शिक्षक व आध्यात्मिक गुरु असे पाच गुरु असल्याचे ते म्हणाले. यावरच आपला जीवन प्रवास घडत असतो. धर्म, अस्मिता, सण, उत्सव, इतिहासाचे स्मरण, संस्कृतीची जोपासना व ग्रामस्वच्छता अभियान यावरच शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर संस्कार घडवावे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हा संदेश विजय करंजकर यांनी दिला.
विद्यार्थ्यांत संस्कृती रुजवावीे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 22:32 IST
सिन्नर : शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर भारतीय संस्कृतीचे जतन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प.पू. गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांनी केले. भगूर येथे नाशिक जिल्हा शिवसेनेच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यावेळी गुरुमाउली मोरे बोलत होते. शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज कला दालनात झालेल्या कार्यक्रमात मोरे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
विद्यार्थ्यांत संस्कृती रुजवावीे
ठळक मुद्देअण्णासाहेब मोरे : आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण