शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

एकलव्य शाळेत प्रकल्प अधिकाऱ्यांना घेराव

By admin | Updated: July 10, 2017 17:28 IST

शहरातील नामांकित विद्यालयात अर्ज करूनही प्रवेश मिळाला नसल्याने सोमवारी (दि.१०) पेठरोडवरील एकलव्य शाळेतपालकांनी एकच गोंधळ घालून प्रकल्प अधिकाऱ्यांना घेराव.

लोकमत न्यूज नेटवर्कपंचवटी : आदिवासी विकास विभागाकडून आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जात असला तरी शहरातील नामांकित विद्यालयात अर्ज करूनही प्रवेश मिळाला नसल्याने सोमवारी (दि.१०) पेठरोडवरील एकलव्य शाळेत विद्यार्थ्यांच्या पालकांनी एकच गोंधळ घालून प्रकल्प अधिकाऱ्यांना घेराव घातल्याची घटना घडली आहे. परिसरात अखेर तणावाचे वातावरण पसरल्याने संतप्त पालकांनी आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त कार्यालयाकडे धाव घेतली. शाळेत प्रवेशार्थी विद्यार्थ्यांची निवड सोडत पद्धतीने करण्याची प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे ऐकून संतप्त पालकांनी गोंधळ घातला. आदिवासी विकास विभागाकडून आदिवासी विद्यार्थ्यांना शहरातील नामांकित शाळेत प्रवेशासाठी प्रवेशप्रक्रिया राबविली जाते. गेल्या काही दिवसांपासून पेठरोडवरील आदिवासी विकास विभागाच्या एकलव्य शाळेत प्रवेशप्रक्रिया सुरू असून, यासाठी जवळपास ५०० विद्यार्थ्यांच्या पालकांनी अर्ज सादर केले आहेत. शाळेत जवळपास २०० ते २५० जागा असल्याने सादर अर्जांची संख्या लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचे प्रवेश होऊ शकणार नाही, असे संबंधितांकडून सुचविण्यात आले. याशिवाय प्रवेशार्थी विद्यार्थ्यांच्या पालकांनी जि.प., तसेच खासगी शाळांत प्रवेशासाठी धाव घेतली असता त्यांना प्रवेश मिळाला नाही. सोमवारी प्रवेशप्रक्रिया सुरू असताना पालकांनी शाळेत धाव घेतली असता जागा कमी असल्याने विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया ही सोडत पद्धतीने काढणार असल्याचे सांगण्यात आल्याने पालकांचा संताप अनावर झाला व त्यांनी आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी व अन्य कर्मचाऱ्यांना खोलीतच घेराव घालून घोषणाबाजी केली. एकलव्य शाळेत काहीतरी गोंधळ झाल्याचे वृत्त कळताच पंचवटी पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धाव घेतली, मात्र संतप्त पालकांनी पोलीस वाहन प्रवेशद्वारावरच अडवून धरल्याचे समजते. अखेर सदर प्रवेशासंबंधी आदिवासी विकास विभागाचे आयुक्त निर्णय घेतील, असे सांगण्यात आल्याने संतप्त पालकांनी आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयात धाव घेतली होती.