नाशिक : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील येळ्ळूर गावात पोलिसांकडून मराठी भाषिकांना झालेल्या मारहाणीचा अखिल भारतीय महाराष्ट्र सेनेच्या नाशिक शाखेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे. याबाबत संघटनेने दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, कर्नाटक-बेळगाव पोलिसांनी मराठी भाषिक महिला व पुरुषांवर केलेला अमानुष हल्ला अत्यंक खेदजनक आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी संबंधित प्रकरणात दोषी असलेल्या पोलीस अधिकारी व कर्र्मचाऱ्यांना तातडीने बडतर्फ करावे अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा संघटनेने दिला आहे. पत्रकावर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष यशवंत जाधव, उपाध्यक्ष शंकर कुर्मी, मोहनराज मंडलिक, नारायण डांमरे, अनिल कट्यारे, आनंद घोडके, भटू अहिरे आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.
महाराष्ट्र सेनेकडून येळ्ळूर घटनेचा निषेध
By admin | Updated: August 2, 2014 01:22 IST