शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटी एक्स्प्रेसची साखळी ओढून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 01:47 IST

पंचवटी एक्सप्रेसचे दोन डबे नाशिकरोड रेल्वेस्थानकावरील प्रवाशांसाठी राखीव ठेवण्याचे आदेश असतानाही मनमाड येथूनच दोन्ही डब्यांमध्ये प्रवासी बसून आल्याने प्रवाशांना बसण्यासाठी जागाच होऊ शकली नाही.

नाशिकरोड : पंचवटी एक्सप्रेसचे दोन डबे नाशिकरोड रेल्वेस्थानकावरील प्रवाशांसाठी राखीव ठेवण्याचे आदेश असतानाही मनमाड येथूनच दोन्ही डब्यांमध्ये प्रवासी बसून आल्याने प्रवाशांना बसण्यासाठी जागाच होऊ शकली नाही. त्यामुळे संतापलेल्या प्रवाशांनी तीनदा साखळी ओढून निषेध नोंदविला. या घटनेमुळे मात्र पंचवटी एक्स्प्रेस ४५ मिनिटे उशिराने मुंबईला पोहोचली.मनमाडहून मुंबईला जाणाऱ्या पंचवटी एक्स्प्रेसचे सर्वसामान्य चार कोच नाशिकरोड रेल्वेस्थानकावर प्रवाशांसाठी खोलले जातात. सोमवारी सकाळी ७ वाजून ७ मिनिटांनी पंचवटी एक्स्प्रेसचे नेहमीप्रमाणे प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर आगमन झाले. नाशिकरोड रेल्वे स्थानकासाठी आरक्षित असलेल्या सर्वसामान्य चार कोच पैकी दोन कोच अगोदरच उघडलेले असल्याने त्यामध्ये प्रवासी बसून आले होते.त्यामुळे नाशिकरोड रेल्वे स्थानकात असलेल्या प्रवाशांना नेहमीच्या डब्यामध्ये बसण्यासाठी जागाच नव्हती. सकाळी ७.१५ वाजता पंचवटी एक्स्प्रेसमध्ये पाणी भरून झाल्यानंतर गाडी सुरू होताच नाशिकरोडचे राखीव डबे अगोदरच उघडलेले असल्याने रेल्वे प्रशासनाचा निषेध करत संतप्त प्रवाशांनी साखळी ओढून तीनवेळा गाडी थांबवली. संतप्त झालेल्या प्रवाशांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी वरिष्ठ रेल्वे अधिकारी उपस्थित नव्हते. रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा दलाचे अधिकारी, कर्मचारी व रेल्वेच्या काही अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती घेऊन वरिष्ठांना कळविण्याचे आश्वासन देत प्रवाशांची समजुत काढल्याने यामुळे तब्बल ४५ मिनीटे उशिराने ७.४५ वाजता नाशिकरोड रेल्वेस्थानकातून पंचवटी पुढे मार्गस्थ झाली. देवळाली रेल्वेस्थानकात महिला वर्गाच्या डब्यामध्ये पुन्हा साखळी ओढण्यात आली. त्यामुळे पंचवटी पाठोपाठ मुंबईला जाणारी सेवाग्राम एक्स्प्रेस अडकून पडली होती.पंचवटी एक्स्प्रेसचा पाठीमागील एक कोच गेल्या १५ दिवसांपासून काढण्यात आल्याने इतर कोचवर प्रवाशांचा भार वाढला आहे. पंचवटी एक्स्प्रेसच्या वेळेबाबत व विविध अडचणीबाबत स्थानिक रेल्वे अधिकारी गांभीर्याने लक्ष देत नसल्याने त्याचा त्रास सर्वसामान्य प्रवाशांना सहन करावा लागत आहे.- राजेश फोकणे, सदस्य, रेल्वे सल्लागार समिती

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेNashikनाशिक