दिल्ली येथे दि.९ रोजी काही सनातन विद्रोही समाजकंटकांनी भारतीय संविधानाची प्रत जाळून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरुद्ध केलेली घोषणाबाजी मानव जातीला काळिमा फासणारी आहे. या घटना शासनाच्या हलगर्जीपणामुळे घडत असून हे प्रकार असेच चालू राहिले तर पक्षाच्यावतीने आंदोलनाचे पाऊल उचलण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे. याप्रसंगी पक्षाचे सरचिटणीस किशोर सोनवणे, तालुकाध्यक्ष बापुराज खरे, जिभाऊ अहिरे, देवा गांगुर्डे, बापू पवार, दादा खैरनार, विनायक खरे, राजू भामरे, जगदीश भामरे, यशवंत अहिरे, यशवंत भामरे, सुरेश पवार, राहुल खरे, रमेश व्यापार, सुरेश पवार, भाऊसाहेब उशीर, रमेश वाघ, प्रदीप सोनवणे, अशोक खरे, दत्तू खरे, सुनील भामरे, अप्पा बोराळे व कार्यकर्ते उपस्थित होते.
संविधानाची प्रत जाळल्याचा रिपाइंतर्फे सटाण्यात निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 17:08 IST