शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

मराठा क्रांती मोर्चा पाठपुरावा समितीची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 00:46 IST

गेल्या वर्षी कोपर्डी येथील अमानुष अत्याचाराच्या घटनेतील आरोपींना फाशीच्या शिक्षेच्या मागणीसह मराठा समाजाच्या अन्य मागण्यांसाठी मुंबईत ९ आॅगस्ट रोजी क्रांतीदिनी राज्यस्तरीय मराठा क्रांती मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी संपूर्ण राज्यभरातून २१० सदस्यांची पाठपुरावा समिती स्थापन करण्यात आली आहे. नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चातर्फे बुधवारी (दि.२) पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या पाठपुरावा समितीची घोषणा करण्यात आली.

नाशिक : गेल्या वर्षी कोपर्डी येथील अमानुष अत्याचाराच्या घटनेतील आरोपींना फाशीच्या शिक्षेच्या मागणीसह मराठा समाजाच्या अन्य मागण्यांसाठी मुंबईत ९ आॅगस्ट रोजी क्रांतीदिनी राज्यस्तरीय मराठा क्रांती मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी संपूर्ण राज्यभरातून २१० सदस्यांची पाठपुरावा समिती स्थापन करण्यात आली आहे. नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चातर्फे बुधवारी (दि.२) पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या पाठपुरावा समितीची घोषणा करण्यात आली.कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार करून तिच्या हत्येच्या घटनेला एक वर्षाचा कालावधी उलटूनही आरोपींना शिक्षा झालेली नाही. या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी, या मागणीसाठी मराठा समाज एकवटला असून, राज्यभरात वेगवेगळ्या जिल्ह्णांमधून ५७ मराठा क्रांती मूक मोर्चे काढल्यानंतरही कोपर्डीच्या आरोपींना शिक्षा झालेली नाही. तसेच मराठा समाजाच्या अन्य मागण्याही प्रलंबितच आहेत. त्यामुळे मराठा समाजात सरकारच्या विरोधात असलेली प्रचंड नाराजी व असंतोष धुमसत असून, मुंबईतील मराठा मूक क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाज सरकारप्रती रोष व्यक्त करण्याचा निर्धार मराठा समाजाने केला आहे. या मोर्चाच्या माध्यमातून कोपर्डीतील आरोपींना फाशीची शिक्षा, मराठा समाजाला आरक्षण, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात दुरुस्ती, शेतकºयांची संपूर्ण कर्जमुक्ती व शेतीमालास हमीभाव आदी २० मागण्यांसाठी मुंबईत ९ आॅगस्टला क्रांतीदिनी राज्यस्तरीय मराठा क्रांती मूक मोर्चा काढण्यात येणार आहे.या मोर्चासाठी व पुढील दिशा ठरविण्यासाठी राज्यस्तरीय पाठपुरावा समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीत नाशिकचे चंद्रकांत बनकर, शरद तुंगार, योगेश नाटकर, सोमनाथ जाधव, विलास पांगरकर व माधवी पाटील यांच्यासह राज्यभरातील २१० सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. या पाठपुरावा समितीत राज्यस्तरीय तज्ज्ञ व समन्वय समितीच्या सदस्यांचाही समावेश आहे. या समितीची यादी बुधवारीच इ मेलद्वारे राज्यपाल, मुख्यमंत्री व महसूलमंत्री यांना पाठविण्यात आल्याची माहिती नाशिक मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीनेदिली. दरम्यान, सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांबाबत त्वरित निर्णायक पाऊल उचलावे, अन्यथा ९ आॅगस्टला क्रांतीदिनी मुंबईतील मराठा क्रांती मोर्चात सरकारला मराठा समाजाच्या असंतोषास सामोरे जावे लागेल, असा इशाराही पत्रकार परिषदेतून देण्यात आला. यावेळी राज्यस्तरीय पाठपुरावा समितीतील नाशिकच्या सदस्यांसह मराठा समाजातील विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.तज्ज्ञ, समन्वय समितीमराठा क्रांती मोर्चातर्फे जाहीर करण्यात आलेल्या २१० सदस्यीय पाठपुरावा समितीत राज्यस्तरीय तज्ज्ञ व समन्वय समितीचाही समावेश आहे. या समितीत मुख्य मार्गदर्शक साताºयाचे खासदार उदयनराजे भोसले व राज्यसभेचे खासदार संभाजीराजे भोसले यांच्यासह जयसिंगराव पवार, पुरुषोत्तम खेडेकर, सुधीर सावंत, रघुनाथ दादा पाटील, बुधाजीराव मुळीक, प्रकाश पोहरे, शशिकांत पवार, प्रतापसिंह जाधव, राजेंद्र कोंढरे, संजीव भोर, करण गायकर, गणेश कदम, नानासाहेब जावळे, किशोर चव्हाण, चंद्रकांत बºहट, दिलीप पाटील, प्रा. एम. एम. तांबे यांचा समावेश आहे.