नाशिक : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या ९४ व्या जयंतीनिमित्त शहरातून मिरवणूक काढण्यात आली़ या मिरवणुकीत पाच चित्ररथांनी सहभाग घेतला होता़ भद्रकालीतून सुरू झालेल्या या मिरवणुकीत महापौर यतिन वाघ यांच्या हस्ते साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला़ मिरवणुकीत साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समिती, मोठा राजवाडा, मरिमाता मित्रमंडळ, गंजमाळ येथील विलास गोपले मित्रमंडळ, आरपीआय सेक्युलर मित्रमंडळ, आम्रपाली इंदिरानगर मंडळ या मंडळांचे चित्ररथ होते़ हिंदी चित्रपट गीते तसेच ढोल ताशांच्या तालावर समाजबांधवांनी यावेळी ताल धरला होता़ महात्मा फु ले पुतळ्यापासून सुरू झालेली ही मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करीत कालिदास कलामंदिराजवळील अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ तिची सांगता झाली़ मिरवणुकीत समाजबांधव तसेच लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़ (प्रतिनिधी)
साठे जयंतीनिमित्त शहरात मिरवणूक
By admin | Updated: August 2, 2014 01:21 IST