नाशिक : दीडशे वर्षांहून अधिक परंपरा असणाºया आणि नवसाला पावणाºया दाजिबा (बाश्ािंग) वीराची मिरवणूक शुक्रवारी (दि. २) बुधवार पेठेतून धार्मिक वातावरणात मोठ्या उत्साहात काढण्यात आली. मिरवणूक पाहण्यासाठी अलोट गर्दी केलेल्या भाविकांनी दाजिबा वीराचे भक्तिपूर्ण वातावरणात दर्शन घेतले. दाजिबा वीर मिरवणूक शुक्रवारी धुळवडच्या दिवशी बुधवार पेठेतून पारंपरिक पद्धतीने काढण्यात आली. तत्पूर्वी होळी पौर्णिमेच्या रात्री तळेगाव जानोरी (ता. दिंडोरी) येथे दाजिबा वीराची पारंपरिक पूजा करून वीर नाशिकमध्ये आणण्यात आले. दुपारी २ च्या सुमारास जुने नाशिक येथील बुधवार पेठेतून दाजिबा वीराची मिरवणूक काढण्यात आली. दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या मिरवणुकीची सुरुवात यंदाही बुधवार पेठेतून झाली. मिरवणूक मार्गावर महिलांनी सडा-रांगोळी काढल्याने परिसरात प्रसन्न वातावरण होते.
दाजिबा वीराची शहरातून मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 01:09 IST