शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेकडून प्रक्रिया सुरू : ‘कपाट’चा प्रश्न लागणार मार्गी अनधिकृत बांधकामे होणार नियमानुकूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 01:21 IST

महाराष्टÑ शासनाने ३१ डिसेंबर २०१५ पूर्वीची अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर नाशिक महापालिकेनेही त्याबाबत अधिसूचना जारी केली असून, काही नियम-निकषांवर अनधिकृत बांधकामे नियमानुकूल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देमहापालिकेच्या खजिन्यात दीडशे कोटी रुपये उत्पन्न भोगवटाधारककडून प्रस्ताव मागविले सुमारे ३० ते ४० टक्के प्रकरणे मार्गी

नाशिक : महाराष्टÑ शासनाने ३१ डिसेंबर २०१५ पूर्वीची अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर नाशिक महापालिकेनेही त्याबाबत अधिसूचना जारी केली असून, काही नियम-निकषांवर अनधिकृत बांधकामे नियमानुकूल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. या प्रक्रियेमुळे शहरातील प्रलंबित असलेला ‘कपाट’चाही प्रश्न बव्हंशी मार्गी लागणार आहे. नियमितीकरणासाठी प्रशमन शुल्क, विकास शुल्क व पायाभूत सुविधा शुल्कच्या माध्यमातून महापालिकेच्या खजिन्यात सुमारे दीडशे कोटी रुपये उत्पन्न जमा होण्याची शक्यता आहे.महाराष्टÑ शासनाच्या नगरविकास विभागाने महापालिका हद्दीतील अनधिकृत बांधकामे प्रशमन शुल्क वसूल करून प्रशमित संरचना (कंपाऊंडिंग स्ट्रक्चर) म्हणून घोषित करत नियमानुकूल करण्याचा निर्णय घेतला असून, त्याबाबतची नियमावली ७ आॅक्टोबर २०१० रोजी जाहीर केलेली आहे. याच शासन नियमावलीचा आधार घेत नाशिक महापालिकेने शहरातील अनधिकृत बांधकामे नियमानुकूल करण्यासाठी जागामालक अथवा भोगवटाधारक यांच्याकडून प्रस्ताव मागविले आहेत. शासनाच्या धोरणानुसार, दि. ३१ डिसेंबर २०१५ पूर्वी झालेली अनधिकृत बांधकामे प्रशमन आकार लावून ‘प्रशमित संरचना’ म्हणून घोषित केली जाणार असून, ती करून घेण्यासाठी नगररचना विभागाने सदरचे प्रस्ताव मागविले आहेत. सदर प्रस्ताव स्वीकारण्यासाठी महापालिकेने दि. ३१ मे २०१८ पर्यंत मुदत दिलेली आहे. सहा महिन्यांच्या आत दाखल होणाºया प्रस्तावांवर नियम-निकषांनुसार निर्णय घेतले जाणार आहेत. या धोरणामुळे शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित होणार असतानाच गेल्या दोन-अडीच वर्षांपासून नाशिककरांना छळणारा ‘कपाट’चाही मुद्दा यातून मार्गी लागणार आहे. नवीन विकास नियंत्रण नियमावलीनुसार, नऊ मीटर रस्त्यांच्या बांधकामांवरील सुमारे ३० ते ४० टक्के प्रकरणे मार्गी लागली आहेत.