शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

महिला आरक्षणामुळे प्रस्थापितांची अडचण

By admin | Updated: October 16, 2015 22:09 IST

देवळा : नगरपंचायत निवडणुकीत घरच्यांना उमेदवारी

देवळा : नगरपंचायतीच्या निवडणुकीत सतरा वर्षांनंतर प्रथमच १७ जागांपैकी १३ जागा सर्वसाधारण व नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. महिलांना ५१ टक्के आरक्षण मिळाल्याने राजकारणी मंडळींना त्यांच्या प्रभागांत अडचण निर्माण झाली असून, त्यांनी आपला मोर्चा इतरत्र सोयीच्या प्रभागांत वळविला आहे. बहुसंख्य राजकीय मंडळींच्या घरातील काही मंडळी प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे दिसून येत आहे.देवळा नगरपंचायतीच्या १७ प्रभागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत १०९ उमेदवार रिंगणात असून, ९ प्रभाग महिलांसाठी राखीव आहेत. एकूण ४६ महिला या प्रभागांतून उमेदवारी करीत आहेत. यापैकी ३० महिला राजकारणी मंडळींच्या घरातीलच असून, अपवाद सोडल्या तर उर्वरित महिला प्रथमच उमेदवारी करीत आहेत. या निवडणुकीत आपल्या घरातील महिलांनाच उमेदवारीसाठी प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. या निवडणुकीत जिल्हा परिषदेचे कृषी सभापती केदा अहेर यांच्या पत्नी धनश्री अहेर, पंचायत समितीचे माजी उपसभापती अशोक अहेर यांच्या पत्नी व माजी जि. प. सदस्य भारती अहेर, माजी उपसरपंच जितेंद्र अहेर यांच्या पत्नी व माजी उपसरपंच सुलभा अहेर, माजी ग्रामपालिका सदस्य उदयकुमार अहेर यांच्या पत्नी अश्विनी अहेर, माजी उपसरपंच दयाराम अहेर यांच्या पत्नी सुनंदा अहेर, माजी सरपंच संतोष अहेर यांची स्रुषा सुरेखा अहेर, माजी सरपंच दिनकर अहेर यांची स्नुषा अनुजा अहेर, माजी सरपंच उत्तम अहेर यांची स्नुषा सरला अहेर, माजी सरपंच अनिल अहेर यांची स्नुषा दीप्ती अहेर, माजी सरपंच रामभाऊ अहेर यांची स्नुषा सुरेखा अहेर, माजी ग्रामपंचायत सदस्य डॉ. दादाजी अहेर यांची स्नुषा मीना अहेर, बाजार समितीचे संचालक प्रदीप अहेर यांची पत्नी सिंधू अहेर, माजी ग्रामपंचायत सदस्य रघू नवरे यांची पत्नी बेबी नवरे, माजी ग्रामपंचायत सदस्य उल्हास गुजरे यांची पत्नी मनीषा गुजरे, माजी ग्रामपंचायत सदस्य कौतिक हिरे यांची पत्नी शकुंतला हिरे, माजी सरपंच परशराम अहेर यांची पत्नी वत्सला अहेर, माजी ग्रामपंचायत सदस्य संजय अहेर यांची पत्नी ज्योत्स्रा अहेर, माजी सरपंच अशोक अहेर यांची भावजई मंगला अहेर, मधुकर पांडुरंग पतसंस्थेचे चेअरमन संतोष शिंदे यांची पत्नी वनीता शिंदे, माजी सरपंच पुंडलीक अहेर यांची स्नुषा वृषाली अहेर, दाजी पाटील पतसंस्थेचे उपाध्यक्ष दिलीप अहेर यांची पत्नी शीला अहेर, माजी ग्रामपंचायत सदस्य संगीता गांगुर्डे, माजी सदस्य पुष्पा गुजरे, सुरेखा अहेर, सरला गांगुर्डे आदि उमेदवारी करीत आहेत. तसेच ललिता भामरे, चित्रा अहेर, निर्मला अहेर, गीता अहेर, सोनाली अहेर, सिंधू अहेर, सुनीता पवार, मनीषा अहेर, सुरेखा अहेर, यशोमती गुजरे, कलाबाई पवार, अर्चना पवार, शीतल वाघ, पद्मा पवार, पल्लवी अहेर, विजया हिरे, जया अहेर, शोभा अहेर, मंगला अहेर आदि महिला रिंगणात आहेत. (वार्ताहर)सध्या जरी सर्वत्र उमेदवारी करणाऱ्या महिलांची चर्चा असली तरी खरे चित्र सोमवारी (दि. १९) माघारीनंतरच स्पष्ट होणार आहे. किती महिला निवडणूक लढवतील हा चर्चेचा विषय ठरला आहे. (वार्ताहर)