शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

‘स्मार्ट सिटी’चा हिस्सा देण्यातही अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 00:25 IST

स्मार्ट सिटी अभियानात नाशिकचा समावेश झाल्यानंतर दरवर्षी महापालिकेने आपला हिस्सा कंपनीकडे जमा करणे बंधनकारक आहे. मात्र, महापालिकेने आतापर्यंत कंपनीकडे ३० कोटी रुपयेच वर्ग केले असून, पाच महिन्यांत ७० कोटी रुपये अदा करण्याचे आव्हान आहे.

नाशिक : स्मार्ट सिटी अभियानात नाशिकचा समावेश झाल्यानंतर दरवर्षी महापालिकेने आपला हिस्सा कंपनीकडे जमा करणे बंधनकारक आहे. मात्र, महापालिकेने आतापर्यंत कंपनीकडे ३० कोटी रुपयेच वर्ग केले असून, पाच महिन्यांत ७० कोटी रुपये अदा करण्याचे आव्हान आहे. एकीकडे महापालिका प्रशासनाकडून विकासकामांसाठी कोटींच्या कोटी उड्डाणे घेतली जात असताना स्मार्ट सिटी कंपनीला पैसे देण्यात मात्र खळखळ केली जात आहे. दरम्यान, स्मार्ट सिटी कंपनीकडे आतापर्यंत एकूण ३१३ कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाले असून, अद्याप त्यातील एक छदामही खर्च होऊ शकलेला नाही.  केंद्र सरकारने स्मार्ट सिटी अभियानात आॅगस्ट २०१६ मध्ये नाशिकचा दुसºया टप्प्यात समावेश केला आणि लगोलग अनुदान नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या खात्यात जमाही होऊ लागले. स्मार्ट सिटी योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, केंद्र सरकारकडून पाच वर्षांत नाशिकला पाचशे कोटी रुपये प्राप्त होणार असून, त्याच्या पन्नास टक्के निधी २५० कोटी रुपये राज्य सरकारला, तर २५० कोटी रुपये महापालिकाला आपला हिस्सा म्हणून मोजावा लागणार आहे. प्रतिवर्षी महापालिकेने आपला ५० कोटी रुपयांचा हिस्सा देणे बंधनकारक आहे. त्यानुसार, महापालिकेकडून सन २०१६-१७ या आर्थिक वर्षाचे ३० कोटी रुपयेच जमा असून, त्यातील २० कोटी रुपये अद्याप देणे बाकी आहे. तसेच सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाचेही ५० कोटी रुपये महापालिकेला मोजावे लागणार आहे. त्यामुळे येत्या मार्च २०१८ अखेर महापालिकेला ७० कोटी रुपये कंपनीला अदा करावे लागणार आहेत. महापालिकेला बंधनात्मक खर्च अदा करताना मोठी कसरत करावी लागत असताना प्रशासन मात्र सत्ताधाºयांच्या तालावर नाचण्याचे काम करत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. महापालिकेची एकूणच आर्थिक स्थिती, उत्पन्न जमा बाजू व खर्च बाजू आणि अंदाजपत्रकातील तरतुदींचा विचार न करता विकास कामांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची प्राकलने तयार करण्याचा घाट घातला जात आहे. स्मार्ट सिटी अभियानात समावेश झालेल्या महापालिकेला घरपट्टी-पाणीपट्टीसह आपल्या उत्पन्नात वाढ करण्याची अट घालण्यात आलेली आहे. परंतु, उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करणे आणि थकबाकी वसुलीवर भर देण्याऐवजी महापालिकेकडून मात्र उधळपट्टी सुरू असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे.कंपनीकडे ३१३ कोटी जमास्मार्ट सिटीसाठी कंपनीच्या खात्यात आतापर्यंत एकूण ३१३ कोटी रुपये जमा झालेले आहेत. त्यात केंद्र सरकारकडून १९० कोटी, राज्य सरकारकडून ९३ कोटी, तर महापालिकेकडून ३० कोटी रुपये प्राप्त झाले आहेत.केंद्र सरकारने कंपनी स्थापन झाल्यानंतर पायाभूत सुविधांसह प्रकल्प आराखड्यावर खर्च करण्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी पाठविलेला होता. त्यातील १.५० कोटी रुपये खर्च झाले असून १.२५ कोटी रुपये, तर केवळ आराखड्यावर खर्ची पडले आहेत.