शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नवीन मतदार यादीच्या अडचणी पक्षांनाही मान्य

By admin | Updated: September 13, 2016 01:14 IST

नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक

नाशिक : तोंडावर निवडणूक येऊन ठेपलेल्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाची जुनी मतदार यादी रद्द करून नवीन मतदार यादी तयार करण्याचे काम वास्तवात अवघड असल्याचे मान्य करीत, केंद्रीय निवडणूक आयोग याप्रश्नी काय भूमिका घेते त्यावरच सारे अवलंबून असल्याच्या प्रतिक्रिया या निवडणुकीच्या रिंगणात उतरू पाहणाऱ्या उमेदवारांनी व्यक्त केल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाची मतदार यादी कायद्यानुसार नवीन करण्यात यावी, असे पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिले आहे. मात्र राज्यात नाशिक व अमरावती विभागात नोव्हेंबरपूर्वीच निवडणूक होणार असल्याने या मतदारसंघासाठी नवीन मतदार यादी तयार करणे काहीसे अडचणीचे आहे. मुळात जुन्या मतदार यादीच्या आधारे राजकीय पक्ष व त्यांच्या उमेदवारांनी गेल्या काही महिन्यांपासून प्रचार सुरू केला असून, जवळपास पन्नास टक्क्याहून अधिक मतदारांशी संपर्कही साधण्यात आला आहे. निवडणुकीला दीड महिन्याचा कालावधी शिल्लक असताना अचानक मतदार यादी बदलली तर त्याचा प्रचारावर काहीसा परिणाम होऊ शकतो, असे मत राजकीय पक्षांनी व उमेदवारांनी व्यक्त केले आहे, मात्र यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोग काय भूमिका घेतात त्यावरच पुढील चित्र स्पष्ट होईल, असे मतही व्यक्त करण्यात आले आहे. जुन्या मतदार यादीतील जवळपास ६० मतदारांचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही. बोगस मतदानाच्या दृष्टीने ते घातक असल्याची तक्रारही करण्यात आली आहे.