शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

विलंबाच्या प्रवेशामुळे परीक्षेचा घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 00:09 IST

लांबलेल्या प्रवेशफेºयांमुळे अकरावीमध्ये उशिरा प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम भरून काढणे अनेक उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना शक्य झालेले नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना अपुºया अभ्यासावरच परीक्षांना सामोरे जावे लागणार आहे. याबाबत काही महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी थेट कबुली दिली असून, प्रवेशप्रक्रियेला दोष दिला आहे.

नाशिक : लांबलेल्या प्रवेशफेºयांमुळे अकरावीमध्ये उशिरा प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम भरून काढणे अनेक उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना शक्य झालेले नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना अपुºया अभ्यासावरच परीक्षांना सामोरे जावे लागणार आहे. याबाबत काही महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी थेट कबुली दिली असून, प्रवेशप्रक्रियेला दोष दिला आहे. नाशिक महानगरपालिका व देवळाली कॅम्प परिसरातील एकूण ५७ उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश समितीमार्फत प्रवेशप्रक्रिया राबविण्यात आली. मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून सुरू झालेली ही प्रक्रिया आॅक्टोबर महिन्याच्या दुसºया आठवड्यापर्यंत सुरू राहिली. या कालावधीत एकूण नऊ फेºया घेण्यात आल्या असून, शहरातील एकूण उपलब्ध २४ हजार ७५० जागांपैकी २२ हजार ३३ विद्यार्थ्यांनी प्रवेशप्र्रक्रिया पूर्ण केली, तर विविध शाळा-महाविद्यालयांमध्ये २ हजार ७१७ जागा रिक्त राहिल्या. जवळपास चार महिने प्रवेशप्रक्रिया सुरू राहूनही रिक्त जागा हजारोंच्या संख्येत आहे.  प्रवेशासाठी इच्छुक एकही विद्यार्थी प्रवेशापासूून वंचित राहू नये, ही भूमिका घेऊन समितीकडून प्रक्रिया लांबविण्यात आली असताना अकरावीचे वर्ग आॅगस्टपासूनच सुरू झाले, तोपर्यंत केवळ पहिल्या तीन फेºयांमध्ये १५ हजार ११८ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. यात बहुतेक नामांकित आणि मोठ्या महाविद्यालयांची संख्या अधिक होती. या प्रक्रियेतील नियमित चौथी फेरी आॅगस्ट महिन्याच्या दुसºया आठवड्यात संपली. त्यानंतर दोन विशेष फेºया व प्रथम येणाºयास, प्रथम प्राधान्य या तत्त्वानुसार तीन फेºया घेण्यात आल्या. सहावी फेरी आॅगस्टपर्यंत सुरू राहिली. त्यानंतर प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण कसा होणार, याबाबत कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. महाविद्यालयांनीच या विद्यार्थ्यांसाठी जादा वर्ग घेण्याचे फर्मान समितीने सोडले होते; पण अनेक महाविद्यालयांना जादा वर्ग घेणे शक्य झालेले नसल्याचे समोर आले आहे.अभ्यासक्रमाला मुक ले विद्यार्थी अकरावीच्या केंद्रीय आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेत जवळपास तीन ते चार हजार विद्यार्थ्यांचे सप्टेंबर महिन्यात प्रवेश झाले. या विद्यार्थ्यांना आॅगस्ट महिन्यातील शिकविण्यात आलेल्या अभ्यासक्रमाला मुकावे लागले. शिक्षण उपसंचालकांनी यासंबंधी महाविद्यालयांनी जादा वर्ग घेण्याचे निर्देश दिले खरे, परंतु प्रत्यक्षात हे वर्ग होत आहेत की नाही यावर कोणत्याही यंत्रणेने लक्षच दिले नाही. त्यामुळे बहुतेक महाविद्यालयांमध्ये उशिरा प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे.